गुरुवार, नवंबर 14 2024 | 11:03:46 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2024च्या नांदी कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2024च्या नांदी कार्यक्रमाचे आयोजन

Follow us on:

सीएसआयआर- राष्ट्रीय वैज्ञानिक संवाद आणि धोरण संशोधन संस्थेतर्फे (एनआयएससीपीआर) आज पुसा परिसरातील विवेकानंद सभागृहात भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2024 च्या  कर्टन रेझर म्हणजेच नांदी- कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासह  या भव्य विज्ञान महोत्सवाची सुरुवात झाली.

सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या संचालिका प्रा.रंजना अगरवाल यांनी महोत्सवाची वातावरणनिर्मिती करत स्वागतपर भाषण केले. त्या म्हणाल्या, “भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या 10 व्या वर्षीच्या या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत. या महत्त्वाच्या उत्सवाची माहिती विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळावी हा आजच्या या नांदी कार्यक्रमाचा उद्देश आहे. आयआयएसएफ 2024 मध्ये चंद्राच्या प्रतिकृतीसारख्या अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींचे प्रदर्शन मांडले जाईल जे सर्व सहभागींच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा विषय असेल.”

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नवी दिल्लीच्या युजीसी-आंतर विद्यापीठीय प्रवेगक केंद्राचे संचालक प्रा.ए.सी.पांडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्र उभारणीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) यांतील शिक्षणाला चालना देऊन अभिनव संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि भारताच्या वैज्ञानिक कौशल्याचे दर्शन घडवणे हा या आयआयएसएफ 2024 च्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.

सीएसआयआर-एनआयएससीपीआरमध्ये कार्यरत वैज्ञानिक डॉ.मनीष मोहन गोरे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन केले. तसेच विद्यार्थी आणि तज्ञ संवाद सत्रात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली. सीएसआयआर-एनआयएससीपीआरमधील शास्त्रज्ञ डॉ.मेहेर वान यांनी आभारप्रदर्शन करताना उपस्थित मान्यवर, आयोजक तसेच सहभागींविषयी  कृतज्ञता व्यक्त केली.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

“कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी” केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण’ कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कोचिंग (खाजगी शिकवणी संस्‍था-केंद्र) क्षेत्रात पारदर्शकता राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल …