रविवार, नवंबर 17 2024 | 12:09:44 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्ट’ची संयुक्तपणे निर्मिती करण्यासाठी भारत आणि जपानमध्ये अंमलबजावणीविषयक परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी

भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्ट’ची संयुक्तपणे निर्मिती करण्यासाठी भारत आणि जपानमध्ये अंमलबजावणीविषयक परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी

Follow us on:

भारतीय नौदलाच्या जहाजांवरील फिटमेंटकरता युनिकॉर्न मास्ट’ची संयुक्तपणे निर्मिती करण्यासाठी भारत आणि जपानमध्ये काल अंमलबजावणीविषयक परस्पर सामंजस्य करार झाला. जपानमध्ये टोकियो इथल्या भारतीय दूतावासात काल दि. 15 नोव्हेंबर 24 रोजी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी या अंमलबजावणीविषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

जपानमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज आणि जपानच्या संरक्षण मंत्रालयांतर्गतच्या अॅक्विजिशन टेक्नॉलॉजी अँड लॉजिस्टिक्स एजन्सीचे (ATLA) आयुक्त इशिकावा ताकेशी यांनी यासंदर्भात काल झालेल्या कार्यक्रमात दोन्ही देशांच्या वतीने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या, आणि स्वाक्षरीकृत करारांची परस्पर देवाणघेवाण केली.

युनिफाइड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना (UNICORN) हा एकात्मिक संप्रेषण प्रणालीयुक्त मास्ट अर्थात मनोरा असणार आहे. यामुळे लपून केल्या जाणाऱ्या कृती टिपण्याच्या आणि त्यांचा माग काढण्याच्या नौदलाच्या वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा होऊ शकणार आहे.

या प्रगत प्रणालींचा आपल्या व्यवस्थेत अंतर्भाव करण्यासाठी करण्यासाठी भारतीय नौदलाचे काम वेगाने सुरु आहे, आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी जपानच्या सहकार्याने भारतातच या प्रणालीची निर्मिती करणार आहे.

ही प्रणाली प्रत्यक्षात कार्यरत झाल्यानंतर, भारत आणि जपान यांच्यामधील संरक्षण उपकरणे संयुक्तपणे विकसित करणे / निर्मिती करण्याच्या प्रयत्नांमधला हा पहिलाच प्रत्यक्षात उतरलेला प्रयत्न ठरणार आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

सर्वोत्कृष्ट वेब मालिका पुरस्कार: सिनेमाच्या वैविध्यातील प्रगती साजरा करणारा इफ्फीचा उपक्रम

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (इफ्फी) मनोरंजन उद्योगाचा प्रगती करणारा वेग स्वीकारून सिनेमातील उत्कृष्टता साजरी …