गुरुवार, दिसंबर 05 2024 | 04:48:16 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / राष्ट्रपतींनी 2024 साठीचे दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान

राष्ट्रपतींनी 2024 साठीचे दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान

Follow us on:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2024) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे 2024 साठी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले; आणि या पुरस्कारांना सामाजिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे,असे सांगितले. या पुरस्कार विजेत्यांचे अनुकरण करून इतर व्यक्ती आणि संस्थाही दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी पुढे येऊ शकतात, असे त्या म्हणाल्या.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाची संकल्पना ‘सर्वसमावेशकता आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या नेतृत्वाला बळकटी देणे’ या विषयावर आधारित आहे.राष्ट्रपतींनी सांगितले की दिव्यांगजनांमध्ये उद्योजकता वाढवणे, त्यांचे कौशल्य विकसित करणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांची उत्पादने खरेदी करणे आणि त्यांना विपणन सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे,यामुळे त्यांची नेतृत्व क्षमता वाढू शकेल.

राष्ट्रपती म्हणाल्या की, संपूर्ण मानवजातीने दिव्यांगजनांना सुखकर आणि समानतेचे वातावरण मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत.दिव्यांगजनांसाठी अडथळामुक्त वातावरण निर्माण करणे ही समाजाची प्राथमिकता असली पाहिजे. खऱ्या अर्थाने संवेदनशील समाज तोच समाज म्हणता येईल, जो दिव्यांगजनांना समान सुविधा आणि संधी उपलब्ध करून देतो.

राष्ट्रपतींनी सांगितले की, दिव्यांग असणे ही कमतरता नाही तर, ती एक विशेष स्थिती आहे.दिव्यांगजनांना सहानुभूतीची नाही तर, समजुतीची गरज आहे;दयाबुद्धीची नाही तर, संवेदनशीलतेची गरज आहे; विशेष लक्ष देण्याची नाही तर, नैसर्गिक प्रेमाची गरज आहे. समाजाने सुनिश्चित करावे की त्यांना इतर सदस्यांप्रमाणेच समानता, सन्मान आणि आदर मिळावा.

राष्ट्रपतींनी पुढे सांगितले की, इतर व्यक्तींप्रमाणे काम करण्याची संधी मिळाल्याने दिव्यांगजनांमध्ये आत्मविश्वास आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे रोजगार, उद्योग आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्यांचे जीवन सुधारता येऊ शकते.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) आयोजित केलेल्या दोन आठवड्यांच्या ऑनलाइन इंटर्नशिप कार्यक्रमाचा समारोप

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) आयोजित केलेल्या दोन आठवड्यांच्या अल्प-मुदतीच्या ऑनलाइन इंटर्नशिप कार्यक्रमाचा समारोप आज झाला. …