Tuesday, September 08 2026 | 07:17:09 AM
Breaking News

19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :

“आपल्या नारी शक्तीचा मला खूप अभिमान आहे! 19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. हा विजय आपल्या उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे तसेच दृढनिश्चय आणि जिद्दीचे फलित आहे. या विजयामुळे भविष्यात अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळेल. संघाच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा.”

About Matribhumi Samachar

Check Also

राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय टपाल विभागाचे ‘विशेष टपाल आवरण’ प्रकाशित

भारतीय क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी …