Monday, November 23 2026 | 03:39:38 AM
Breaking News

मन बनवा आणि त्वरित कर्ज मिळवा: ॲक्सिस बँकेकडून कार आणि दुचाकी ग्राहकांसाठी अवघ्या 30 मिनिटांत कर्ज वितरणाची सुविधा सुरू

Connect us on:

नागपूर, नोव्हेंबर 2026: भारतातील आघाडीच्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने कार आणि दुचाकी खरेदीदारांसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित वाहन कर्ज सुविधा सुरू केली आहे. वाहन खरेदीसाठीची कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली असून, याअंतर्गत अवघ्या 30 मिनिटांत कर्जाची रक्कम वितरित केली जाऊ शकते. या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा कोणताही वाहन ब्रँड किंवा मॉडेल निवडता येणार आहे. तसेच, कर्ज मंजुरी, डीलरची निवड, ग्राहकांची अधिकृत संमती आणि कर्ज वितरण या सर्व प्रक्रिया एकाच डिजिटल माध्यमातून पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाहनाची निवड केल्यापासून ते वाहनाची मालकी मिळेपर्यंतचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.

डिजिटल वाहन कर्ज क्षेत्रातील एक वेगळेपण ठरणारी ही सुविधा बँकेच्या विद्यमान तसेच नव्या ग्राहकांसाठीही उपलब्ध असेल. या सुविधेअंतर्गत पात्र ग्राहकांना वाहनाच्या एकूण किमतीच्या 100% पर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. तसेच, कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते कर्जाची रक्कम वितरित होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ग्राहकांना डिजिटल माध्यमातून पूर्ण करता येणार आहे.

अर्ज प्रक्रिया कमीत कमी टप्प्यांमध्ये पूर्ण होईल, अशा पद्धतीने या सुविधेची रचना करण्यात आली आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे वाहन निवडणे, कर्जाच्या प्रस्तावाची माहिती घेऊन तो स्वीकारणे, डीलरची निवड करणे, केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आणि कर्ज वितरणासाठी त्वरित अधिकृत संमती देणे या सर्व प्रक्रिया एकाच एकात्मिक डिजिटल प्रणालीद्वारे पूर्ण करता येणार आहेत.

या सुविधेच्या प्रारंभासोबतच ॲक्सिस बँकेने ग्राहकांसाठीच्या या नवीन सुविधेवर आधारित सणासुदीच्या हंगामासाठी विशेष जाहिरात मोहीमही सुरू केली आहे. या मोहिमेची संकल्पना “जैसे ही मन बनाओगे, लोन पाओगे” अशी आहे. या मोहिमेमागे ग्राहकांच्या गरजेशी संबंधित एक साधा विचार आहे. ग्राहकाने वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केवळ वित्तपुरवठ्याच्या प्रक्रियेमुळे त्याची खरेदी रखडू नये. ही बाब लक्षात घेऊन कार आणि दुचाकी कर्जासाठी स्वतंत्र जाहिरात फिल्म्स तयार करण्यात आल्या आहेत. या फिल्म्सच्या माध्यमातून दीर्घ कागदपत्रांची पूर्तता किंवा अनेक ठिकाणी संपर्क साधण्याची आवश्यकता न पडता ग्राहकांना वाहन खरेदीचा निर्णय त्वरित प्रत्यक्षात आणता येतो, हे दाखवण्यात आले आहे. ही जाहिरात मोहीम प्रमुख बाजारपेठांमध्ये डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात प्रसारित केली जात आहे.

ही सुविधा तंत्रज्ञान आणि प्रक्रियांमधील नावीन्यपूर्ण बदलांच्या माध्यमातून कर्ज वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि आधुनिक करण्याच्या ॲक्सिस बँकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. कर्ज मंजुरी आणि वितरणासाठी लागणारा वेळ कमी करून तसेच वित्तपुरवठा अधिक सुलभ करून, अधिकाधिक ग्राहकांना वाहन खरेदी करणे शक्य व्हावे, हा बँकेचा उद्देश आहे. यासोबतच, रिटेल कर्ज क्षेत्रातील आपले स्थान अधिक मजबूत करण्यावरही बँक भर देत आहे.

या सुविधेच्या शुभारंभावर बोलताना ॲक्सिस बँकेचे ग्रुप हेड – व्हील्स, हेमंत नागपाल म्हणाले, “आजच्या काळात ग्राहकांना त्यांच्या निर्णयांच्या वेगाशी सुसंगत अशी कर्जपुरवठा प्रक्रिया अपेक्षित आहे. ही सुविधा बँकिंग सेवा अधिक सोप्या, जलद आणि ग्राहकांच्या गरजांशी एकात्मिक करण्याच्या आमच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना कार आणि दुचाकी कर्ज मिळवण्यासाठी अखंडित डिजिटल अनुभव उपलब्ध होणार आहे. तसेच, डीलर्सच्या खात्यांमध्ये थेट आणि त्वरित निधी हस्तांतरित करण्याची सुविधा मिळणार असल्याने डीलर भागीदारांना पेमेंट लवकर प्राप्त होईल आणि व्यवहारांची कार्यक्षमताही वाढेल. तंत्रज्ञान आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधील आमची गुंतवणूक संपूर्ण परिसंस्थेतील अडथळे कमी करण्यास आणि प्रक्रिया अधिक सुलभ व कार्यक्षम करण्यास मदत करत आहे.”

या जाहिरात मोहिमेबद्दल भाष्य करताना ॲक्सिस बँकेचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनूप मनोहर म्हणाले, “इच्छा आणि पूर्तता यांमधील अंतर पूर्वीपेक्षा खूपच कमी झाले आहे. आजच्या ग्राहकांना प्रत्येक गोष्ट त्वरित हवी असते आणि आयुष्यातील मोठ्या निर्णयांसाठीही त्यांची हीच अपेक्षा असते. ‘जैसे ही मन बनाओगे, लोन पाओगे’ या संकल्पनेद्वारे ग्राहकांच्या बदलत्या वर्तनातील हा बदल आम्ही एका साध्या, सहजपणे समजणाऱ्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समर्पक जाहिरात मोहिमेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात, जेव्हा खरेदी करण्याची ग्राहकांची इच्छा सर्वाधिक असते, तेव्हा ही मोहीम अधिक महत्त्वपूर्ण ठरते. आपल्या आकांक्षा मनात आकार घेताच त्या प्रत्यक्षात आणण्याच्या आनंदाचा उत्सव ही मोहीम साजरा करते.”

आउटब्रेकरने तयार केलेल्या या मोहिमेत रणनीती, सर्जनशीलता आणि एआय-आधारित निर्मिती यांचा संगम आहे. डिजिटल आणि सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करून, ग्राहक खरेदीचा निर्णय घेण्यापासून ते कर्ज मिळवण्यापर्यंतची प्रक्रिया केवळ 30 मिनिटांत किती सहजपणे पूर्ण करू शकतात, हे यात दाखवले आहे.
ही मोहीम पाहण्यासाठी, कृपया खालील लिंकवर क्लिक करा:

About Matribhumi Samachar

Check Also

मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त सांगलीत स्वच्छता अभियानाचे आयोजन

सांगली : मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत मलाबार …