Tuesday, September 22 2026 | 11:24:09 PM
Breaking News

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सेवासदन प्रशालेत बालिका संवाद कार्यक्रम

Connect us on:

सोलापूर, 23 जानेवारी 2025. केंद्र शासनाकडून दरवर्षी 24 जानेवारीला ‘राष्ट्रीय बालिका दिवस’ साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर यांच्या वतीने उद्या सायंकाळी 4.00 वाजता सु.रा. मुलींची प्रशाला, सेवासदन येथे बालिका संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासनाकडून बालिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनाविषयी माहिती, आरोग्य संवाद, निबंध स्पर्धा आणि बक्षीस वितरण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी दिली आहे.

बालिकांसोबत संवाद करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, बाल सरंक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड आणि मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

देशातील मुलींना सक्षम, शिक्षित आणि स्वावलंबी बनवणे हा या दिनामागचा खास उद्देश असून देशातील मुलींना त्यांचे अधिकार आणि हक्क यांबाबत जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

About Matribhumi Samachar

Check Also

NIFT पदवीदान समारंभ २०२६: यशोभूमी येथे १८ संकुलांतील पदवीधरांचा गौरव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) च्या संयुक्त पदवीदान समारंभाचे आयोजन ३१ ऑगस्ट २०२६ रोजी …