Friday, September 18 2026 | 05:28:15 PM
Breaking News

या गणेशोत्सवात, प्रेफरचा मूषक फक्त इच्छा ऐकत नाहीये. तो तुमच्या योजनाही (प्लॅन्स) ऐकून घेत आहे

Connect us on:

“विश करा. प्रेफर करा.” हे अभियान डिजिटल स्टोरीटेलिंग आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांद्वारे एका ओळखीच्या सण-परंपरेला नवीन रूपात सादर करत आहे, सोबत ११ दिवसांची कॅशबॅक ऑफर देखील देत आहे.

मुंबई, सप्टेंबर २०२६: प्रत्येक गणेशोत्सवात, गणेशभक्त श्री गणेशाचे वाहन असलेल्या मूषकाच्या कानात आपली इच्छा व्यक्त करतात आणि आपली प्रार्थना बाप्पापर्यंत पोहोचवण्यावर विश्वास ठेवतात.

यावर्षी, प्रेफर (Prefr) गणपतीच्या या आवडत्या श्रोत्याला एक नवीन जबाबदारी देत आहे: केवळ इच्छा ऐकणेच नाही, तर लोकांनी प्रत्यक्षात आणायच्या ठरवलेल्या योजना (प्लॅन्स) देखील ऐकणे.

“विश करा. प्रेफर करा.” (Wish karo. Prefr karo.) या संकल्पनेवर आधारित, प्रेफरचे ११ दिवसांचे मूषक लोन (Mushak Loan) अभियान या लोकप्रिय सण-परंपरेतून प्रेरणा घेऊन पैसे, योजना आणि कर्जाची उपलब्धता या विषयांवर अधिक सोप्या आणि मानवी दृष्टिकोनातून सोप्प्या असे संवाद साधण्यास सुरुवात करत आहे.

हे अभियान लोकांना त्यांच्या मनात असलेले विचार शेअर करण्याचे आवाहन करते — मग ते त्यांनी अनेक दिवसांपासून ठरवलेले काम असो, पुढे ढकललेली गोष्ट असो किंवा एकाद्या गोष्टीला नव्याने सुरू करण्याची इच्छा असो. ज्यांना आर्थिक मदतीचे पर्याय शोधायचे आहेत, ते पात्रतेनुसार आणि लागू अटींनुसार प्रेफरद्वारे उपलब्ध असलेले कर्ज पर्याय तपासू शकतात.

प्रत्येक इच्छेसाठी कर्जाची गरज असतेच असे नाही. परंतु, जेव्हा एखाद्याकडे एखादी विचारपूर्वक ठरवलेली योजना असते आणि ती पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते, तेव्हा उपलब्ध पर्याय समजून घेणे सोपे, पारदर्शक आणि अनावश्यक चिंतेशिवाय असावे, हा यामागचा विचार आहे.

हे अभियान मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि हैदराबाद येथे आउट-ऑफ-होम (OOH), डिजिटल आणि सोशल मीडिया चॅनेल्सद्वारे राबवले जात आहे. इंस्टाग्रामवर प्रेफर लोकांना थेट डीएम (DM) द्वारे मूषकाला आपली इच्छा किंवा योजना सांगण्याचे आवाहन करत आहे. तसेच उत्सवाच्या काळात निवडक ऑन-ग्राउंड कार्यक्रमांचेही आयोजन केले जाईल.

या अभियानाचा एक भाग म्हणून, प्रेफर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि हैदराबादमधील गणपतीच्या ११ दिवसांत दररोज ११ ग्राहकांना ₹₹१,१०० कॅशबॅक देत आहे. या अभियानाअंतर्गत अर्ज करून कर्ज मंजुरी मिळालेल्या पात्र ग्राहकांमधून सिस्टीम-आधारित लकी ड्रॉ (रँडम प्रोसेस) द्वारे विजेते निवडले जातील.

इच्छा शेअर करणे किंवा अर्ज करणे म्हणजे कर्ज मंजुरी, वितरण किंवा कॅशबॅकची खात्री नाही. सर्व अर्ज कर्जाच्या मूल्यमापन, पात्रता आणि लागू अटी व शर्तींच्या अधीन राहतील. पूर्ण अटी आणि शर्ती https://prefr.com/personal-loan/mushak-loan वर उपलब्ध आहेत.

मूषक लोन अभियानाद्वारे, प्रेफर या क्लिष्ट आणि केवळ व्यवहारापुरत्या मर्यादित असलेल्या आर्थिक क्षेत्रात आत्मीयता आणि सांस्कृतिक ओळख आणत आहे, तसेच माहितीपूर्ण पर्याय आणि जबाबदार कर्ज उपलब्धतेला प्राधान्य देत आहे.

Featured Article

About Matribhumi Samachar

Check Also

मुंबईतील BOCW राष्ट्रीय परिषद २०२६ च्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि इतर मान्यवर.

मुंबईत इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या सामाजिक सुरक्षेवर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित केलेल्या इमारत आणि इतर बांधकाम …