Wednesday, August 26 2026 | 05:39:53 PM
Breaking News

क्वांटम म्युच्युअल फंडाचा ‘क्वांटम फ्लेक्सी कॅप फंड’ बाजारात

Connect us on:

संशोधनाधारित इन्व्हेस्टमेंट पद्धतीद्वारे उद्योगांमधील ‘प्रॉफिट पूल शिफ्ट’च्या संधी ओळखण्यावर भर

मुंबई, ऑगस्ट २०२६: क्वांटम म्युच्युअल फंडाने आज क्वांटम फ्लेक्सी कॅप फंड या नव्या ओपन-एंडेड इक्विटी स्कीमच्या प्रारंभाची घोषणा केली. या स्कीमअंतर्गत लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या इक्विटीमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. या नव्या न्यू फंड ऑफरचा प्रारंभ २१ ऑगस्ट २०२६ रोजी होऊन ४ सप्टेंबर २०२६ रोजी ती बंद होईल. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२६ पासून या स्कीममध्ये नियमित खरेदी-विक्री करता येईल.

या स्कीमचे प्रमुख उद्दिष्ट दीर्घकालीन कॅपिटल अॅप्रिसिएशन साध्य करणे हे आहे. त्यासाठी रिसर्च-ड्रिव्हन आणि बॉटम-अप पद्धतीने स्टॉक सिलेक्शन केले जाणार आहे. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये त्यांच्या ग्रोथ पोटेन्शियल, व्यवसायाची गुणवत्ता आणि व्हॅल्युएशन यांच्या आधारे गुंतवणुकीचे प्रमाण बदलण्याची लवचिकता या स्कीममध्ये असेल.

या फंडाच्या इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीचा मुख्य आधार म्हणजे उद्योगांमधील ‘प्रॉफिट पूल शिफ्ट’ ओळखणे. एखाद्या उद्योगाच्या व्हॅल्यू चेनमध्ये मूल्य आणि नफा कोणत्या दिशेने सरकत आहे, याचा सखोल अभ्यास करून भविष्यात नफ्याचा अधिक मोठा हिस्सा कोणत्या व्यवसायांकडे वळण्याची शक्यता आहे, हे ओळखण्यावर या फंडाचा भर असेल.

टेक्नॉलॉजिकल बदल, इंडस्ट्री कन्सॉलिडेशन, ग्राहकांच्या बदलत्या पसंती तसेच पॉलिसी आणि रेग्युलेटरी बदलांमुळे विविध उद्योगांमधील प्रॉफिट पूलमध्ये स्ट्रक्चरल बदल होऊ शकतात. अशा बदलांची योग्य वेळी ओळख करून त्यातून निर्माण होणाऱ्या इन्व्हेस्टमेंट संधींचा लाभ घेण्याचा प्रयत्न या स्कीमद्वारे केला जाणार आहे.
गुंतवणूक प्रक्रियेत कंपनीची क्वालिटी, मॅनेजमेंटची क्षमता, अर्निंग्सची शाश्वतता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स यांचे सखोल फंडामेंटल अॅनालिसिस केले जाईल. त्यानंतर संबंधित कंपनीच्या स्टॉकचे व्हॅल्युएशन तपासले जाईल. ग्रोथ पोटेन्शियल, शाश्वत बिझनेस मॉडेल, मजबूत आर्थिक स्थिती आणि योग्य व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्यांची निवड करण्यावर भर दिला जाईल.

त्याचबरोबर विविध सेक्टर्स आणि वेगवेगळ्या मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून पोर्टफोलिओमध्ये योग्य डायव्हर्सिफिकेशन राखण्याचा प्रयत्न केला जाईल. एखाद्या कंपनीच्या स्टॉकच्या व्हॅल्युएशनमध्ये अतिआशावाद दिसून आल्यास, त्या कंपनीतील एक्सपोजर कमी करण्याची लवचिकताही या स्कीममध्ये असेल.
या फ्लेक्सी कॅप स्कीममुळे लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप या कोणत्याही सेगमेंटमध्ये आकर्षक इन्व्हेस्टमेंट संधी निर्माण झाल्यास त्यांचा लाभ घेता येणार आहे. ग्रोथ पोटेन्शियल, शाश्वत अर्निंग्स ग्रोथ, मजबूत बॅलन्स शीट, उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि योग्य व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्यांना प्राधान्य दिले जाईल.

या फंडाचे व्यवस्थापन क्वांटम म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी चिराग मेहता आणि इक्विटी फंड मॅनेजर केतन गुजराथी करणार आहेत.

या स्कीमच्या प्रारंभाबाबत बोलताना चिराग मेहता, मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि फंड मॅनेजर, म्हणाले, “भारतामध्ये वाढत्या आकांक्षा, अर्थव्यवस्थेचे फॉर्मलायझेशन, टेक्नॉलॉजिकल बदल, पॉलिसी रिफॉर्म्स आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंती यांमुळे अनेक स्ट्रक्चरल बदल घडत आहेत. या बदलांचा परिणाम विविध उद्योगांमधील प्रॉफिट पूलच्या वाटपावर होत असून, त्यातून इन्व्हेस्टमेंटच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

फंडामेंटल रिसर्चच्या माध्यमातून असे स्ट्रक्चरल बदल ओळखणे आणि योग्य व्हॅल्युएशन असलेल्या उच्च गुणवत्तेच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणे, हा या फंडाच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचा केंद्रबिंदू आहे. क्वांटमच्या शिस्तबद्ध इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीशी बांधील राहत, दीर्घकालीन वेल्थ क्रिएशनची क्षमता असलेला डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ तयार करणे हा आमचा उद्देश आहे.”

क्वांटम अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीमांत शुक्ला म्हणाले, “नवीन प्रॉडक्ट्सची संख्या वाढवण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट कॅपॅबिलिटीज विकसित करण्याला क्वांटमने नेहमीच प्राधान्य दिले आहे. आम्ही वारंवार नवीन इन्व्हेस्टमेंट स्कीम्स बाजारात आणत नाही. त्याआधी आमच्या इन्व्हेस्टमेंट कॅपॅबिलिटीज पूर्णपणे विकसित झाल्याची खात्री करतो.

आमच्या मागील न्यू फंड ऑफरनंतर जवळपास दोन वर्षांनी सुरू होत असलेली ही स्कीम गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये अर्थपूर्ण मूल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. या नव्या स्कीममुळे आमच्या प्रॉडक्ट ऑफरिंगचा विस्तार होण्यासोबतच, प्रमुख बाजारपेठांमधील उपस्थिती वाढवण्यास आणि डिस्ट्रिब्युशन नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल.”

 

Featured Article

About Matribhumi Samachar

Check Also

सहकार सप्ताह २०२६: “सहकारातून समृद्धीकडे” पाऊल; डिजिटल क्रांती आणि PACS आधुनिकीकरणाने बदलणार ग्रामीण भारताचा चेहरा!

भारतातील सहकारी चळवळीला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी २९ जून ते …