बोरीवली मुंबई, सप्टेंबर २०२६: भारतातील अत्यंत विश्वासू आणि रास्त दरात हिऱ्यांचे दागिने पुरवणारा ब्रँड अशी ख्याती असलेल्या ‘कीमती ज्युअल्स’ (Keemti Jewels) ने बोरीवली पश्चिम येथे आपल्या नवीन दालनाचे उद्घाटन केले. ‘कीमती ज्युअल्स’ मंबईतील हे दुसरे दालन आहे. या दालनामुळे मुंबईतील ब्रॅण्डची उपस्थिती आणखी बळकट झाली आहे. नवीन दालनाचे उद्घाटन बोरीवली विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार व मुंबई भाजपचे सरचिटणीस श्री. संजय उपाध्याय, तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आले. हा सोहळा ब्रँडच्या वेगाने होणाऱ्या विस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
नवीन दालन दुकान क्रमांक १ आणि २, तळमजला, द हवेली को-ऑप हाउसिंग सोसायटी, गुलमोहर रोड, सुंदर नगर, बोरिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००९२ येथे स्थित आहे. कीमती ज्युअल्सने आधुनिक तंत्रज्ञानाआधारे तयार केलेली लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी मुंबईच्या प्रतिष्ठित निवासी आणि रिटेल बाजारपेठेत या नवीन दालनामुळे उपलब्ध झाली आहे.
अंधेरी येथे किमतीच्या मुंबईतील पहिल्या मुख्य दालनाच्या उद्घाटनानंतर लगेचच बोरिवलीमध्ये दुसरे नवीन दालन सुरु करण्यात आले आहे. यामुळे प्रमुख बाजारपेठांमध्ये आपले रिटेल क्षेत्रातील अस्तित्व आणखी मजबूत करण्याच्या धोरणातील हे महत्वाचे पाऊल आहे. संपूर्ण भारतात एकापाठोपाठ एक दालन उघडत कीमती ज्युअल्स देशव्यापी जाळे प्रस्थापित करण्यासाठी आणि आपली उत्पादने अधिकाधिक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे.
प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीच्या अनुभवात क्रांती घडवण्याचा कीमतीचा दृष्टिकोन असून या दालनातून तो साकारला आहे. स्वतःची अंतर्गत उत्पादन यंत्रणा आणि खास डिझाइन याव्दारे हा ब्रँड तयार झालेला आहे. त्यामुळे डिझाइन, उत्पादन आणि किंमत या घटकांवर ब्रॅण्डला अधिक नियंत्रण राखता येते. कीमतीने विविध टप्पे एकमेकांना जोडल्यामुळे तसेच कारखान्याप्रमाणे थेट उत्पादन करण्याच्या शैलीमुळे ज्वेलरीचे प्रत्यक्ष उत्पादन आणि ग्राहक यांच्यातील पारंपरिक टप्पे कमी झाले आहे. त्यामुळे कीमतीला प्रमाणित प्रयोगशाळेत तयार केलेले हिऱ्यांचे दागिने अत्यंत किफायतशीर दरात ग्राहकांना उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.
सुमारे ३०,००० रुपये प्रति कॅरेट दराने हिरे उपलब्ध करून देत, कीमती डिझाइन, प्रमाणीकरण आणि कारागिरीवर लक्ष केंद्रित करून या श्रेणीतील पारंपरिक दरांसमोर कीमतीने मोठे आव्हान उभे केले आहे.
बोरिवलीतील नवीन दालनात अंगठ्या, कर्णफूल, बांगड्या आणि गळ्यातील दागिन्यांसोबतच रोजच्या वापरासाठी, ऑफिसमध्ये, लग्नसमारंभात आणि विशेष प्रसंगांसाठी डिझाइन केलेल्या इतर हिऱ्यांच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. ग्राहक तेथे विविध डिझाइन्स, हिऱ्यांचे आकार आणि शैली पाहू शकतात, तसेच ‘मेड-टू-ऑर्डर’ हा पर्याय असल्यामुळे ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार दागिने तयार करून घेऊ शकतात.
उद्घाटनाप्रसंगी बोलताना, कीमती ज्वेल्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अरमान कोठारी म्हणाले, “मुंबई ही कीमतीसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि या महानगरात आमचे दुसरे दालन हा आमच्यासाठी रोमांचक टप्पा आहे. बोरिवलीत ग्राहकवर्ग अतिशय भक्कम असून तो वेगाने विकसित होत आहे. आम्हाला आमचे दागिने या भागातील ग्राहकांच्या अधिकाधिक नजीक आणायचे होते. उत्तम डिझाइन, आमची स्वतःची उत्पादन क्षमता आणि किफायतशीर दरातील उत्पादने एकत्र आणून, ग्राहकांचा हिऱ्यांच्या दागिन्यांबाबतचा अनुभव आणि ते खरेदी करण्याची पद्धत बदलणे, हे आमचे नेहमीच ध्येय राहिलेले आहे. आम्ही संपूर्ण भारतात दालने उघडत असताना, ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरणारे आणि दागिन्यांच्या विविध गरजांसाठी ते पुन्हा आमच्याकडे परत येतील, असा ब्रँड तयार करण्यावर आमचे लक्ष केंद्रित झालेले आहे.”
कीमतीच्या रिटेल विस्तारातून व्यवसायाची सतत वाढणारी गती दिसून येते. हिऱ्यांचे उत्पादन आणि दागिन्यांमध्ये कोठारी समुहाला असलेल्या ४५ वर्षांहून अधिक अनुभवावर हा ब्रँड आधारलेला आहे आणि या उत्पादन परंपरेला साजेसा असा स्वतःच्या डिझाइन स्टुडिओ, अंतर्गत उत्पादन आणि आधुनिक रिटेल अनुभवाची त्याला जोड मिळाली आहे. कोठारी ग्रुप, उद्योजक निखिल कामथ आणि केविन शाह यांच्या पाठबळामुळे कीमती आजच्या युगातील ग्राहकांसाठी हिऱ्यांचे दागिने अधिक सुलभ आणि समर्पक बनवण्यावर लक्ष केंद्रित करत नवीन युगातील दागिन्यांचा व्यवसाय साकारत आहे.
बोरिवलीतील दालन हे कीमतीच्या वेगवान रिटेल विस्तारातील आणखी एक पाऊल आहे. या दालनाव्दारे ब्रँडने डिसेंबर २०२६ पर्यंत ८८ दालन उघडण्याचे लक्ष्य आखलेले आहे. विविध शहरांमध्ये एकापाठोपाठ एक दालन उघडून, कीमती आपला विस्तार वाढवत आहे आणि त्याचबरोबर पारदर्शक व किफायतशीर दरांमध्ये डिझाइन-आधारित, प्रमाणित लॅबमध्ये तयार केलेल्या डायमंड ज्वेलरीचे पर्याय आणखी विस्तारत आहे.
ब्रँडचा विस्तार होत असताना, भारतात हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवण्याची कीमतीची महत्वाकांक्षा आहे. यासाठी इन-हाउस डिझाइन, उत्पादन, स्पर्धात्मक किंमत आणि आधुनिक रिटेल अनुभव यांचा मिलाफ घडवत मौल्यवान दागिने खरेदी करण्याचा अधिक सुलभ आणि पारदर्शक मार्ग कीमतीला साकारायचा आहे.
Website: http://keemtijewels.com/
Featured Article
Matribhumi Samachar Marathi

