Thursday, November 26 2026 | 03:45:27 AM
Breaking News

एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

Connect us on:

मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांच्या कार्याने मानवी भावनांचा सखोल शोध घेऊन अनेक पिढ्यांना आकार दिला आहे आणि त्यांचे कार्य यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :

“मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, श्री एम. टी. वासुदेवन नायर जी यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले. मानवी भावनांचा सखोल शोध घेणाऱ्या त्यांच्या कार्याने अनेक पिढ्या घडवल्या आहेत आणि त्यांचे कार्य या पुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील. मूक आणि उपेक्षितांनाही त्यांनी आवाज दिला. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.”

About Matribhumi Samachar

Check Also

भूमिगत खाणकाम: ऊर्जा सुरक्षेसह पर्यावरणीय संतुलन साधण्याचा प्रभावी मार्ग

भारताची अर्थव्यवस्था, औद्योगिक विस्तार, नागरीकरण आणि विजेच्या वाढत्या वापरामुळे देशातील ऊर्जेची मागणी सातत्याने वाढत आहे. …