राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी देशवासियांना छठ पूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे,“श्रद्धा, उपवास आणि भक्तीने साजरी होत असलेल्या छठ पूजेच्या पवित्र प्रसंगी मी देशवासियांचे हार्दिक अभिनंदन करते आणि माझ्या शुभेच्छा देते. छठ पूजेचा सण देशातील सर्वात जुन्या सणांपैकी एक असून त्यामध्ये सूर्याचे पूजन केले जाते. निसर्गाकडून मिळणारी अनमोल भेट असलेल्या नद्या आणि तलाव यामधील पाण्याची या सणाच्या दिवशी पूजा करण्याचा प्रघात आहे. कडक उपवासामुळे हा सण आपल्या मनाचे शुद्धीकरण करतो.”
पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करण्याची प्रेरणा आपल्याला हा सण देतो. निसर्गाचा अखंड देणारा हात सर्वांच्या द़ष्टीने महत्वाचा आहे, त्यामुळे छठ पूजेच्या निमित्ताने आपली सूर्य, नद्या आणि संपूर्ण निसर्ग यांच्यावषियी असलेली श्रद्धा दृढ करूया. हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद घेऊन येवो आणि निसर्गाविषयी असलेली आपली श्रद्धा सातत्याने वृद्धिंगत होवो.”