बुधवार, दिसंबर 25 2024 | 09:48:16 PM
Breaking News
Home / अन्य समाचार / लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या नेपाळ दौऱ्याची सांगता, संरक्षण आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करत भेटीचा समारोप

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या नेपाळ दौऱ्याची सांगता, संरक्षण आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करत भेटीचा समारोप

Follow us on:

नेपाळच्या पाच दिवसांच्या यशस्वी अधिकृत भेटीनंतर, भारतीय लष्कराचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज भारतात परतले. या भेटीविषयक सर्व निर्धारित उद्दिष्टे पार करत या भेटीने दोन्ही राष्ट्रांमधील मजबूत संरक्षण सहकार्य, सांस्कृतिक संबंध आणि परस्परांविषयी आदर अधिक दृढ केला. दोन्ही प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि भागीदारी वाढवण्यासाठी भारतीय आणि नेपाळी सैन्याची सामायिक वचनबद्धता या भेटीने  अधोरेखित झाली. आपल्या भेटीत लष्करप्रमुखांनी  नेपाळच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाशी व्यापक प्रमाणावर चर्चा केली. नेपाळचे उच्च आदरणीय राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, उच्च माननीय पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माननीय संरक्षण मंत्री मनबीर राय यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठका घेतल्या. नेपाळच्या लष्कराचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत त्यांनी अर्थपूर्ण चर्चाही केली. या वैशिष्ट्यपूर्ण परस्परसंवादातून अत्यंत मोकळेपणा आणि परस्पर आदर प्रतीत होत त्यातून द्विपक्षीय संबंध मजबूत होण्याच्या दृष्टीने सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित झाली.

भेटीची ठळक वैशिष्ट्ये:

• बीर स्मारक येथे श्रद्धांजली: लष्करप्रमुखांनी एका समारंभात तुंडीखेलच्या बीर स्मारक येथे नेपाळच्या शहीद शूरवीरांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी नेपाळी लष्कराच्या मुख्यालयात उत्कृष्ट अशा गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली.

• नेपाळी लष्करासोबत धोरणात्मक चर्चा: भारत-नेपाळ संबंध मजबूत करणे हा या भेटीमागचा मध्यवर्ती विषय होता. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नेपाळच्या  लष्कराचे  लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी परस्पर हितसंबंध आणि मार्गांबाबत चर्चा केली. नेपाळी लष्कराच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी लष्करप्रमुखांना माहिती दिली आणि इतर वरिष्ठ लष्करी नेत्यांशी उच्चस्तरीय चर्चा केली. या चर्चांमध्ये लष्करी बंधने, संयुक्त सराव, प्रशिक्षण सहकार्य आणि क्षमता विकास, जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सामायिक वचनबद्धता बळकट करण्यावर भर देण्यात आला. भारतीय लष्कराने दोन्ही सैन्यांमधील मैत्रीचे प्रतिक म्हणून नेपाळी लष्कराला पराक्रमी अश्व आणि लढाऊ श्वान यांचा नजराणा दिला.

• मानद जनरल रँक प्रदान: काठमांडूच्या शीतल निवास येथे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना नेपाळचे उच्च माननीय राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी नेपाळी लष्कराचे मानद जनरल पद प्रदान केले. या अनोखी परंपरेने भारतीय आणि नेपाळी लष्करांमधील खोलवर रुजलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध अधोरेखित झाले .

• सांस्कृतिक आणि सामाजिक बंध: दोन देश आणि त्यांच्या सैन्यांमधील अद्वितीय सांस्कृतिक आणि सामाजिक बंध यांचा लष्करप्रमुखांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांचे महत्त्व जाणून भारतीय आणि नेपाळी सैन्यादरम्यान वृद्धिंगत झालेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

• शिवापुरीच्या आर्मी कमांड अँड स्टाफ कॉलेज येथे संबोधन: लष्करप्रमुखांनी शिवापुरी येथील नेपाळ आर्मी कमांड अँड स्टाफ महाविद्यालयात भावी नेतृत्वाचे प्रबोधन करताना “युद्धाचे बदलणारे स्वरूप” या विषयावर व्याख्यान दिले. दोन्ही सैन्यांची क्षमता आणि कार्यक्षमता मजबूत आणि सखोल करण्याच्या उद्देशाने परस्पर सहभाग निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.

• दिग्गजांचा सहभाग: लष्करप्रमुख पोखरा येथील निवृत्तीवेतन प्रदान कार्यालयात ज्येष्ठ गोरखा आणि भारतीय सैन्यातील वीर नारी यांच्याशी संवाद साधत माजी सैनिकांच्या रॅलीत सहभागी झाले. हे ज्येष्ठ आणि भारतीय सैन्य यांच्यातील बंध अतिशय दृश्यमान आणि समृद्ध करणारा होता ज्याने त्यांच्यातील मजबूत बंध प्रतिबिंबित झाले. लष्करप्रमुखांनी नागरी समाजातील ज्येष्ठांच्या भूमिकेची प्रशंसा केली आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची  पोचपावती दिली. 18 व्या बटालियनचे सुभेदार मेजर आणि मानद कॅप्टन गोपाल बहादूर थापा (निवृत्त), जम्मू आणि काश्मीर रायफल्स, त्यांच्या स्वत:च्या युनिटचे सुभेदार मेजर, ज्येष्ठांशी वैयक्तिक आणि भावनिक संबंध दर्शवणारा त्यांचा संवाद हा या रॅलीदरम्यानचा एक हृदयस्पर्शी क्षण ठरला. बुटाला आणि डुंगडी येथे प्रत्येकी एक अशा एकूण  दोन ECHS पॉलीक्लिनिक जोडण्याबरोबरच ECHS पॅनेलमधील रुग्णालयांच्या संख्येत वाढ करण्याच्या घोषणेसह त्यांच्या कल्याणासाठी भारत सरकारच्या अटल वचनबद्धतेचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. हे उपक्रम ज्येष्ठांच्या कल्याणासाठी भारत सरकार आणि भारतीय लष्कराच्या संकल्पाचे प्रतिबिंब आहेत.

• नेपाळच्या लष्करप्रमुखांना आमंत्रण: जनरल द्विवेदी यांनी नेपाळी लष्कराच्या लष्करप्रमुखांना भारत भेटीसाठी औपचारिक आमंत्रण दिले, ज्याचे उद्दिष्ट सध्याच्या भेटीच्या परिणामांचा प्रभाव वाढवणे आणि वृद्धिंगत करणे हा आहे.

सर्वसमावेशक चर्चा आणि परस्पर आदराने चिन्हांकित केलेल्या या भेटीमुळे भारतीय आणि नेपाळी सैन्यांमधील मजबूत भागीदारी आणखी सशक्त झाली आहे. संरक्षण सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि प्रादेशिक सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करून या भेटीच्या परिणामांमुळे सहकार्याच्या नवीन युगाची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …