गुरुवार, दिसंबर 12 2024 | 10:22:00 PM
Breaking News
Home / अन्य समाचार / इफ्फी 2024 मधील ‘अमर आज मरेगा’ आणि ‘स्वर्गरथ’ हे चित्रपट अनोख्या कथानकांसह जीवन, मृत्यू आणि विनोदाचा शोध घेतात

इफ्फी 2024 मधील ‘अमर आज मरेगा’ आणि ‘स्वर्गरथ’ हे चित्रपट अनोख्या कथानकांसह जीवन, मृत्यू आणि विनोदाचा शोध घेतात

Follow us on:

गोव्यातील 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट आणि प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित करण्याच्या महोत्सवाच्या समर्पणाचा एक भाग म्हणून अमर आज मरेगा (हिंदी) आणि स्वर्गरथ (आसामी)  या दोन चित्रपटांच्या कलाकार आणि तंत्रज्ञांनी  आज पणजी येथे पत्रकार परिषदेत माध्यमांना संबोधित केले. यावेळी विचार करायला लावणारा  संवाद पहायला मिळाला.

प्रथमच दिग्दर्शक बनलेल्या रजत लक्ष्मण कारिया याने अमर आज मरेगा ला प्रत्यक्ष पडद्यावर साकारण्याचा त्याचा प्रवास उलगडून दाखवला. ही कथा कागदावर एक स्वप्न म्हणून सुरू झाली आणि कारियाच्या या चित्रपटाने  इफ्फीमध्ये स्थान मिळवले ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे , ज्याचे श्रेय त्यांनी त्यांचे निर्माते प्रकाश झा आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) यांना त्याने दिले. कारिया यांनी नवीन प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि उदयोन्मुख निर्मात्यांना मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल इफ्फी  2024 चे आभार मानले.

हा चित्रपट मृत्यू सारख्या नाजूक विषयाला सकारात्मक वळण देऊन हाताळलेला आहे.  त्याचे शीर्षक भयंकर वाटू शकते – “अमर आज मरेगा” – हा चित्रपट संदेश देतो की “मृत्यू म्हणजे जीवनाचा उत्सव आहे”. चित्रपटाचा तात्विक दृष्टीकोण जीवन आणि मृत्यूच्या संकल्पनेने  कसा प्रभावित  झाला होता ते संकलन प्रक्रियेत अनवधानाने  प्रतिबिंबित झाले याबद्दल दिग्दर्शकाने सांगितले.

“माझ्या चित्रपटाची सुरुवात ‘आनंद’ या चित्रपटातील एका वाक्याने होते. निर्मिती दरम्यान तो जाणीवपूर्वक संदर्भ नव्हता मात्र मला संकलनादरम्यान जाणवले की  मृत्यूला सामोरे जाताना जीवन कसे साजरे करायचे याचा शोध या चित्रपटात आहे.  मला असे वाटत नाही की मृत्यू निषिद्ध आहे. ही केवळ लोकांची भीती आहे.

चित्रपट रसिकांच्या या पिढीत मीम्स लोकप्रिय झाले आहेत आणि 2005 मध्ये वयाच्या वाढीच्या एका टप्प्यात असताना मी प्रियदर्शनच्या भागमभाग आणि हेराफेरी सारख्या विनोदीपटांनी प्रभावित झालो होतो. हेरा फेरी तर कॉमेडीसाठी रोल मॉडेल बनला आहे. आज 15 वर्षांनंतरही आपण  या चित्रपटांचे मीम्स बनवतो आणि त्यावर हसतो.  प्रियदर्शन हा विनोदी  चित्रपटांचा रोल मॉडेल आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

मृत्यू सारख्या अतिशय गंभीर विषयावर विनोदी ढंगाने भाष्य करणाऱ्या ‘स्वर्गरथ’ या चित्रपटाची निर्मिती करताना आलेल्या आव्हानांबद्दल दिग्दर्शक राजेश भुयान यांनी  आपले मनोगत सांगितले.

विनोद हा कलाप्रकार नेहमीच अनुल्लेखित आणि कमी महत्वाचा मानला जात असला तरी अभिनयाच्या या अंगावर प्रभुत्व मिळवणे सर्वात अवघड आहे, असे ते म्हणाले. आपण या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवण्यात आणि आयुष्य, मृत्यू आणि सामाजिक मूल्ये या विषयांवर प्रबोधनात्मक विचार मांडू शकलो यातच या चित्रपटाचे यश सामावलेले आहे, असे ते म्हणाले. या चित्रपटाच्या गंभीर आणि व्यावसायिक यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की आसामी चित्रपट उद्योगावर या चित्रपटाचा प्रभाव पडला असून त्यामुळे केवळ प्रेमकहाणी आणि ऍक्शन चित्रपट या पारंपरिक पगड्यातून प्रेक्षक  बाहेर यायला मदत झाली आहे.

शववाहिनीचा चालक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पोलिस अधिकारी या व्यक्तिरेखांसह इतर अनेक पात्रांच्या चित्रीकरणातून आणि एका अनोख्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या स्वर्गरथ या चित्रपटात जीवन आणि मृत्यूमागील गर्भितार्थ कशाप्रकारे मांडला आहे, यावर लेखक संतनु रोवमुरिया यांनी चर्चा केली.

भारतात  2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर आधारित, या चित्रपटात गंभीर सामाजिक भाष्यासह ब्लॅक कॉमेडीचे मिश्रण करणारे कथानक विणले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत साधारणपणे गंभीर रीत्या हाताळल्या जाणाऱ्या विषयाला विनोदी ढंगाने  अर्थपूर्ण बनवले असल्याचे  रोवमुरिया यांनी सांगितले.

आम्ही अनेक चित्रपटांची निर्मिती करतो मात्र जेव्हा राष्ट्रीय व्यासपीठावर आपल्याला ओळख मिळते तो क्षण सर्वात आनंददायी असतो. आमच्यासारख्या ईशान्येकडील राज्यातील लोकांसाठी याचे महत्व खूप जास्त आहे. मला सर्व टीमचे अभिनंदन करायचे आहे आणि त्यांचे आभार मानायचे आहेत. प्रत्येकानेच आपले काम अगदी चोख केले आहे. कालच मला इफ्फी मध्ये हा चित्रपट हिंदी भाषेत करण्याविषयी विचारण्यात आले आणि त्याबद्दल मला अभिमान वाटत आहे. आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल, थँक यु इफ्फी’ असे या चित्रपटाचे निर्माते संजीव नारायण म्हणाले.

कोविड 19 महामारीच्या लाटेने कळस गाठला असताना या चित्रपटाचे चित्रीकरण कशाप्रकारे केले आणि हा आसामी चित्रपट तयार करताना आलेल्या आव्हानांबाबत स्वर्गरथ या चित्रपटाच्या निर्मात्या अक्षता नारायण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महामारीच्या आव्हानात्मक काळात अडथळे असतानाही प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल नारायण यांनी अभिमान व्यक्त केला.

नारायण म्हणाली की, चित्रपटाचे यश हे गोळीबंद कथानक आणि कोविड संकटाचा सामना करत काम सुरूच ठेवण्याचा टीमचा निर्धार प्रतिबिंबित करते. कथेने प्रेक्षकांशी जोडलेले नाते आणि प्रदर्शित केलेला आशय संपन्न सिनेमाचा प्रभाव, याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.

हिरामणी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. पत्रकार परिषद येथे पाहता येईल.

‘स्वर्गरथ’

स्वर्गारथ हा आसामी चित्रपट बैकुंठा, या शवागाराच्या व्हॅन चालकाची कथा उलगडतो. हा चालक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि दोन पोलिसांच्या संपर्कात येतो, जे पैशांनी भरलेली बॅग ताब्यात घेतात. 2016 च्या नोटाबंदीच्या काळावर बेतलेला हा चित्रपट, ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून  जीवन आणि मृत्यूच्या भ्रामक कल्पनांवर प्रकाश टाकतो.  हा चित्रपट विनोद आणि सामाजिक भाष्य यामध्ये समतोल साधतो. सहज मिळणारा पैसा आणि त्याचे टाळता न येण्याजोगे परिणाम सांगताना, मृत्यू हा मानवी जीवन प्रवासाचे अंतिम सत्य आहे, हे अधोरेखित करतो. प्रहसनाच्या  शैलीतून पुढे सरकणारा हा चित्रपट, विनोदी प्रसंगांमधून गंभीर मुद्दे मांडतो.

‘अमर आज मरेगा’

‘अमर आज मरेगा’, ही हिंदी नॉन-फीचर फिल्म, अमरसिंग बापट या 62 वर्षीय विधुराची कथा सांगतो. आपले जीवन पूर्णत्वाला पोहोचले आहे, या विश्वासाने तो आपले जीवन संपवण्याचा विचार करतो. तथापि, त्याचे शांतपणे मृत्यू पावणे, त्याच्या शेजाऱ्यांसाठी वादाचे कारण बनते, कारण ते त्याच्या मृत्यूच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. हा चित्रपट आत्महत्येभोवती असलेल्या नैतिक दुविधांचा धांडोळा घेतो, मृत्यू आणि जीवनाबद्दलच्या सामाजिक दृष्टीकोनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …