मंगलवार, जनवरी 07 2025 | 07:52:42 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके मिळायला हवी – कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके मिळायला हवी – कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

Follow us on:

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री  शिवराज सिंह चौहान म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना कोणत्याही  परिस्थितीत चांगल्या दर्जाची खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळतील याची खात्री केली पाहिजे. या संदर्भात,  मंत्रालयामार्फत विभागनिहाय आढावा घेण्‍यात आला,  त्यावेळी  कृषीमंत्री  चौहान यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी दोषींवर कठोर आणि प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या.

नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे कृषी मंत्रालयाचा विभागनिहाय आढावा घेताना केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांना उच्च दर्जाची कीटकनाशके, बियाणे आणि खते नेहमी उपलब्ध करून दिली पाहिजेत, यावर भर दिला.  मंत्री चौहान म्हणाले की, आगामी पीक हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी ते लवकरच राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. याचे  कारण म्हणजे,  प्रामुख्याने राज्य स्तरावरच प्रभावी उपाययोजना केल्या जातात.

शेतकरी बांधवांना दर्जेदार कीटकनाशके आणि  खते मिळावीत यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रित मोहीम राबवावी, असेही केंद्रीय मंत्री चौहान यांनी सांगितले. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी खते, बियाणे आणि कीटकनाशकांबाबत संयुक्त मोहीम राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून ही मोहीम देशभरात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारांमार्फत विनाविलंब प्रभावीपणे राबविता येईल.  यावेळी  चौहान म्हणाले की, यासंदर्भात शेतकऱ्यांकडूनही अभिप्राय, मते घेण्यात यावीत, कारण प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्‍या बी-बियाणांमुळे शेतक-यावरच प्रभाव पडतो आणि पिकांचे नुकसान होते.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …