राज्यसभेत आज गदारोळातच सभापती जगदीप धनखड यांनी सदस्यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आठवड्याभरात तेच तेच मुद्दे वारंवार उपस्थित केले गेले असून आपण कामकाजाचे 3 दिवस वाया घालवले आहेत. सार्वजनिक कारणासाठी वचनबद्धता असलेले हे ते दिवस आहेत. अपेक्षेप्रमाणे आपण आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे.
वेळेचे नुकसान, संधी गमावणे, प्रश्नोत्तराचा तास होत नसल्यामुळे संधी गमावणे, यामुळे जनतेच्या हिताचे मोठे नुकसान होत आहे.
माननीय सदस्यांनी सखोल चिंतन करावे. नियम 267 चा उपयोग व्यत्यय निर्माण करणारे अस्त्र म्हणून केला जात आहे, आपल्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण करण्यासाठी होत आहे. सदनात अत्यंत वरिष्ठ सदस्य आहेत. सदनातला गदारोळ ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
या प्रकारावर मी तीव्र खेद व्यक्त करत आहे. अत्यंत दुःखाची ही बाब आहे. आपण अशोभनीय उदाहरण समोर ठेवत आहोत. या देशातील लोकांचा आपण अपमान करत आहोत. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता आपण करत नाही.
आपली कृती लोककेंद्रित नाही. लोकांमध्ये याबाबत नापसंती आहे. आपण असंबद्धतेच्या दिशेने जात आहोत.
कृपया मी तुम्हाला आवाहन करतो.