शुक्रवार, नवंबर 22 2024 | 06:57:51 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले समारोपीय भाषण

दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले समारोपीय भाषण

Follow us on:

माननीय महोदय,

आपण सर्वांनी दिलेल्या मौल्यवान सूचनांचे आणि व्यक्त केलेल्या सकारात्मक विचारांचे मी स्वागत करतो.  माझा चमू तुमच्याबरोबर भारताच्या प्रस्तावांच्या संदर्भात सर्व तपशील सामायिक करेल आणि आपण सर्व बाबतीत कालबद्ध रितीने पुढे जाऊ.

महोदय,

भारत आणि कॅरिकॉम देशांमधील संबंध हे आपले भूतकाळातील सामायिक अनुभव, वर्तमानातील आपल्या सामायिक गरजा आणि भविष्यातील आपल्या सामायिक आकांक्षा यावर आधारित आहेत.

या संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी भारत पूर्णपणे कटिबद्ध आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमध्ये, आम्ही ग्लोबल साऊथच्या चिंता आणि प्राधान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

गेल्या वर्षी, भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, जी 20 ही संघटना साऊथ ग्लोबलचा आवाज म्हणून उदयास आली.  काल, ब्राझीलमध्येही, मी जागतिक समुदायाला साऊथ ग्लोबल देशांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत यावर भारत आणि आमचे सर्व कॅरिकॉम सदस्य मित्र देश सहमत आहेत, यांचा मला आनंद आहे. .

या जागतिक संस्थांनी स्वतःला आजच्या जगाशी आणि आजच्या समाजाशी जुळवून घेणे आवश्यक असून ही  काळाची देखील गरज आहे.  हे प्रत्यक्षात साकारण्यासाठी, कॅरिकॉम सोबत  दृढ सहकार्य आणि कॅरिकॉम ला पाठींबा मिळणे खूप महत्वाचे आहे.

महोदय,

आज आमच्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले,  ते प्रत्येक क्षेत्रातील आपल्या सहकार्याला नवीन आयाम प्रदान  करतील. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात भारत-कॅरिकॉम संयुक्त आयोग आणि संयुक्त कार्यगट यांची महत्त्वाची भूमिका असेल.

आपले सकारात्मक सहकार्य पुढे नेण्यासाठी, तिसरी कॅरिकॉम शिखर परिषद भारतात आयोजित केली जावी, असा प्रस्ताव मी सादर करतो.

पुन्हा एकदा, मी राष्ट्राध्यक्ष इरफान अली, पंतप्रधान डिकॉन मिशेल, कॅरिकॉम सचिवालय आणि तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

‘सफरनामा’च्या उद्घाटनाने इफ्फीएस्टा ‘सफर’चा प्रारंभ

55 वा  इफ्फी  अर्थात भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, संगीत कला आणि संस्कृतीला मनोरंजनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी …