Saturday, May 16 2026 | 01:17:52 AM
Breaking News

विकसित भारत @ 2047 साठी डीआरडीओच्या दृष्टिकोनाचे प्रदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय राजभाषा वैज्ञानिक संगोष्ठीचे एचईएमआरएल’ने केले आयोजन

Connect us on:

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) एक प्रमुख प्रयोगशाळा, हाय एनर्जी रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) ने 11-12 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त राजभाषा वैज्ञानिक आणि तांत्रिक संगोष्ठीचे (एसीई क्लस्टर) यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमाची संकल्पना “विकसित भारत @ 2047 साठी डीआरडीओचे योगदान” अशी होती. या संगोष्ठीत संरक्षण प्रणालींमध्ये तांत्रिक श्रेष्ठता आणि स्वावलंबनाकडे भारताची प्रगती अधोरेखित करण्यात आली, तसेच वैज्ञानिक आणि तांत्रिक संवादात राजभाषा हिंदीच्या वापराला चालना देणे, यावर भर होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. संतराम देशवाल “सौम्य” यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एचईएमआरएलचे जी – श्रेणीतील शास्त्रज्ञ ‘जी’ तसेच कार्यकारी संचालक डॉ. हिमांशू शेखर उपस्थित होते.

एचईएमआरएलचे जेष्ठ शास्त्रज्ञ तसेच आर्मामेंटस ॲंड कॉम्बॅट इंजिनिअरिंग सिस्टीम्स चे महासंचालक प्रो. डॉ. प्रतीक किशोर तसेच एचईएमआरएल संचालक डॉ. ए. पी. दास दूरदृश्य प्रणालीमार्फत या समारंभात सहभागी झाले होते.

दोन दिवसांच्या या संगोष्ठीत देशभरातील विविध डीआरडीओ प्रयोगशाळांचा उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला. एचईएमआरएल मधील शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी 150 हून अधिक वैज्ञानिक प्रबंध आणि संशोधन सादरीकरणांद्वारे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कार्यक्रमात नामवंत विद्वानांची तांत्रिक सत्रे, उदयोन्मुख संरक्षण तंत्रज्ञानावर परस्परसंवादी चर्चा आणि भारताच्या प्रगत संरक्षण परिसंस्थेला आकार देण्यात डीआरडीओच्या भूमिकेवर केंद्रित चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या.

हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला. राजभाषा हिंदीमध्ये वैज्ञानिक संशोधन, ज्ञानाची देवाणघेवाण आणि तांत्रिक संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून या संगोष्ठीने स्थान मिळवले.

About Matribhumi Samachar

Check Also

चैत्र नवरात्रीचा ६ वा दिवस: पंतप्रधान मोदींनी मागितले माता कात्यायनीचे आशीर्वाद; शेअर केला खास संदेश

“देवीच्या कृपेने भक्तांना मिळो अपार शक्ती आणि आत्मविश्वास”; पाहा पंतप्रधानांनी ‘X’ वर काय म्हटले. नवी …