Thursday, September 10 2026 | 06:08:04 PM
Breaking News

प्रजासत्ताक दिन संचलन 2025: सर्वोत्तम संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर

Connect us on:

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन संचलन 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथ यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/ इतर पूरक दलांचे संचलन पथके  तसेच विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या चित्ररथांचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांच्या तीन समित्या नेमण्यात आल्या होत्या.

सर्वोत्तम संचलन पथक :

  • जम्मू आणि काश्मीर रायफल्स संचलन पथक
  • सर्वोत्तम संचलन पथक (सीएपीएफ/इतर पूरक दल) : दिल्ली पोलीस संचलन पथक
  • सर्वोत्तम चित्ररथ (राज्ये/केंद्रशासित प्रदेश):
    • प्रथम क्रमांक – उत्तर प्रदेश_महाकुंभ 2025 – स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास_  
    • द्वितीय क्रमांक – त्रिपुरा_अनंत भक्ती: त्रिपुरातील 14 देवतांची पूजा – खर्ची पूजा_  
    • तृतीय क्रमांक – आंध्र प्रदेश_एतीकोप्पका बोम्मालू – पर्यावरणपूरक लाकडी खेळणी_

सर्वोत्तम चित्ररथ (केंद्रीय मंत्रालये/विभाग)

  • आदिवासी कार्य मंत्रालय (जनजातीय गौरव वर्ष) 

विशेष पुरस्कार

  1. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी) – _भारतीय राज्यघटनेच्या 75 वर्षांचा गौरव_
  2. ‘जयति जय मम भारतम्’ नृत्य समूह

‘माय गव्हर्मेंट’ पोर्टलवरील लोकप्रियता मतदान निकाल

हे मतदान 26 ते 28 जानेवारी 2025 दरम्यान घेण्यात आले होते, जिथे नागरिकांना त्यांच्या आवडत्या चित्ररथांसाठी व संचलनासाठी पथकांसाठी मतदान करता आले.

  • सर्वोत्तम संचलन पथक (सेवा – Services) – सिग्नल्स आकस्मिक दल 
  • सर्वोत्तम संचलन पथक (सीएपीएफ/इतर पूरक दल) – सीएपीएफ संचलन पथक
  • लोकप्रियता मतदानानुसार सर्वोत्तम चित्ररथ (राज्ये/केंद्रशासित प्रदेश):
    • प्रथम क्रमांक – गुजरात (स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास)
    • द्वितीय क्रमांक – उत्तर प्रदेश (महाकुंभ 2025 – स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास)
    • तृतीय क्रमांक – उत्तराखंड (उत्तराखंड: सांस्कृतिक वारसा आणि साहसी क्रीडा)

लोकप्रियता मतदानानुसार सर्वोत्तम चित्ररथ (केंद्रीय मंत्रालये/विभाग)

महिला आणि बालविकास मंत्रालय, (महिला व मुलांच्या बहुआयामी प्रगतीचा प्रवास, मंत्रालयाच्या सर्वसमावेशक योजनांद्वारे पोषित हा संचलन सोहळा भारतीय संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेच्या समन्वयाचा भव्य उत्सव होता.)

About Matribhumi Samachar

Check Also

महिला व बालविकास मंत्रालयाच्या ‘कारा’कडून पुण्यात ४ थी प्रादेशिक कार्यशाळा यशस्वी; दिव्यांगांच्या कौटुंबिक पुनर्वसनावर भर!

केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (CARA …