Tuesday, September 22 2026 | 05:20:03 PM
Breaking News

स्क्रीनपासून स्टोअरपर्यंत: मिराजिओने नवी मुंबईत आपले पहिले स्टोअर सुरू केले

Connect us on:

वाशी, नवी मुंबई येथे दुसरे स्टोअर सुरू करून मिराजिओने डिजिटल-फर्स्ट अक्सेसरीज ब्रँडपासून ऑनलाइन ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देता येईल अशा ब्रँडकडे वाटचाल करण्याचे पुढचे पाऊल टाकले आहे.

मुंबई, सप्टेंबर, 2026:  भारताच्या आघाडीच्या हँडबॅग आणि अक्सेसरीज ब्रँड्सपैकी एक असलेल्या मिराजिओने नवी मुंबईतील वाशी येथील इनऑर्बिट मॉलमध्ये आपले दुसरे स्टोअर सुरू केले आहे. या उद्घाटनासह मिराजिओने मुंबई महानगर प्रदेशात प्रवेश केला असून, हा देशातील फॅशन आणि रिटेल क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि लक्षवेधी बाजारपेठांपैकी एक आहे. या नव्या स्टोअरच्या माध्यमातून मिराजिओचा डिजिटल-फर्स्ट ब्रँडपासून प्रत्यक्ष रिटेल नेटवर्क उभारणाऱ्या ब्रँडकडे होणारा प्रवास अधिक दृढ झाला आहे. आतापर्यंत ज्यांनी मिराजिओला केवळ ऑनलाइन माध्यमातून पाहिले किंवा अनुभवले आहे, अशा ग्राहकांना आता प्रथमच मिराजिओच्या उत्पादनांचा प्रत्यक्ष स्टोअरमध्ये अनुभव घेता येणार आहे.

डिजिटल माध्यमातून ग्राहकांशी जोडलेला ब्रँड म्हणून मिराजिओने आपल्या ग्राहकांच्या पसंती, गरजा आणि अपेक्षा सातत्याने जाणून घेतल्या आहेत. या ग्राहकांच्या अपेक्षांपैकी एक महत्त्वाची अपेक्षा होती ती म्हणजे ब्रँडचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी. वाशी येथील नव्या स्टोअरच्या माध्यमातून ब्रँडने हीच अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आतापर्यंत ऑनलाइन माध्यमातून हँडबॅग पाहण्याचा अनुभव आता प्रत्यक्ष खरेदीच्या अनुभवात रूपांतरित झाला आहे. ग्राहकांना हँडबॅग जवळून पाहता येतील, त्यांचा आकार, प्रमाण आणि डिझाइनमधील बारकावे जाणून घेता येतील, तसेच त्या त्यांच्या दैनंदिन वापरासाठी किती अनुरूप आहेत, याचा प्रत्यक्ष अंदाज घेता येईल. भारतासारख्या ऑफलाइन-फर्स्ट बाजारपेठेत हा विस्तार मिराजिओला ग्राहकांच्या अधिक जवळ नेणारा आणि ब्रँडशी थेट संवाद साधण्यासाठी प्रभावी ठरणारा एक धोरणात्मक टप्पा आहे.

534 चौ. फूट क्षेत्रफळात, जी2 मजल्यावर असलेले हे स्टोअर मिराजिओच्या समकालीन सौंदर्यशैलीचे रूपांतर एका उबदार आणि विचारपूर्वक साकारलेल्या जागेत करते. सॉफ्ट क्रीम आणि सौम्य सँड टोनच्या रंगसंगतीने स्टोअरच्या इंटीरियरची मूलभूत शैली निश्चित केली आहे. शिल्पाकृती स्वरूप, वक्राकार पृष्ठभाग आणि विचारपूर्वक केलेली प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण जागेला गतिमान आणि आकर्षक रूप प्राप्त झाले आहे. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे स्टोअरच्या मध्यवर्ती भागाला एक वैशिष्ट्यपूर्ण अंडाकृती छतावरील डिझाइन. त्यासोबत प्रकाशमान निचेसमध्ये उत्पादनांचे कलेक्शन आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक मऊ, आरामदायी आणि वातावरणाशी सुसंगत असा रिटेल अनुभव मिळतो.

उद्घाटनाबाबत बोलताना मिराजिओचे संस्थापक आणि सीईओ मोहित जैन म्हणाले, “वाशी येथील आमच्या स्टोअरचे उद्घाटन हा मिराजिओची उपस्थिती मुंबईत अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुंबई ही भारतातील फॅशन आणि रिटेल क्षेत्रातील सर्वाधिक प्रभावशाली बाजारपेठांपैकी एक आहे. चेन्नईतील आमच्या स्टोअरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, ग्राहकांना मिराजिओचा अनुभव केवळ स्क्रीनपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष अनुभवणे किती महत्त्वाचे वाटते, हे आम्हाला जाणवले. आता हाच अनुभव नवी मुंबईतील ग्राहकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला आनंद होत आहे. देशभरातील आमचे रिटेल नेटवर्क विस्तारत असताना, ग्राहकांशी अधिक दृढ आणि जवळचे नाते निर्माण करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

स्टोअरची रचना जाणीवपूर्वक सहज आणि ग्राहकाभिमुख ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना पारंपरिक उत्पादन-केंद्रित मांडणीऐवजी आपल्या सोयीने संपूर्ण स्टोअरमध्ये फिरता यावे आणि विविध श्रेणी व प्रसंगानुसार योग्य उत्पादने स्वतःहून शोधता यावीत, याचा विचार करून जागेची रचना करण्यात आली आहे. वर्क बॅग्स आणि प्रशस्त टोट बॅग्सपासून शोल्डर बॅग्स, क्रॉसबॉडी स्टाइल्स, वॉलेट्स आणि दैनंदिन वापरातील अक्सेसरीजपर्यंत मिराजिओच्या विविध उत्पादनांचा विस्तृत संग्रह येथे पाहायला मिळतो. यामुळे या प्रत्यक्ष स्टोअरची भूमिका केवळ खरेदी-विक्रीपुरती मर्यादित राहत नाही. ऑनलाइन माध्यमातून ग्राहकांना सहसा वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवायला मिळणारी ब्रँडची दृश्य ओळख, टेक्स्चर, रचना आणि उपयुक्तता हे सर्व घटक आता एकाच ठिकाणी, एका समग्र अनुभवाच्या रूपात प्रत्यक्ष अनुभवता येतात..

नवी मुंबईतील हे उद्घाटन मिराजिओच्या फिजिकल रिटेल क्षेत्रातील व्यापक विस्ताराचा एक भाग आहे. प्रमुख महानगरांमध्ये आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या दिशेने ब्रँडने वाटचाल सुरू केली आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये 10 पेक्षा अधिक स्टोअर्स  सुरु करण्याचे मिराजिओचे नियोजन आहे. प्रत्येक नवीन ठिकाणाकडे केवळ एकसारख्या रिटेल फॉरमॅटची पुनरावृत्ती म्हणून न पाहता, आपल्या ब्रँडची ओळख आणि सौंदर्यदृष्टी वेगळ्या पद्धतीने प्रत्यक्ष साकारण्याची संधी म्हणून पाहत आहे.

मिराजिओसाठी फिजिकल रिटेल क्षेत्रात प्रवेश करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांचा ब्रँड अनुभव अधिक व्यापक आणि प्रत्यक्ष स्वरूपात बदलणे हा आहे. वाशी येथील नवे स्टोअर ग्राहकांना मिराजिओशी ऑनलाइन माध्यमातून झालेली ओळख आता प्रत्यक्ष अनुभवात रूपांतरित करण्याची संधी देते. येथे ग्राहक उत्पादनांना प्रत्यक्ष हाताळू शकतात, विविध कलेक्शन्सचा जवळून अनुभव घेऊ शकतात आणि ब्रँडशी अधिक सखोल व प्रत्यक्ष पद्धतीने जोडले जाऊ शकतात.

Featured Article

About Matribhumi Samachar

Check Also

या गणेशोत्सवात, प्रेफरचा मूषक फक्त इच्छा ऐकत नाहीये. तो तुमच्या योजनाही (प्लॅन्स) ऐकून घेत आहे

“विश करा. प्रेफर करा.” हे अभियान डिजिटल स्टोरीटेलिंग आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांद्वारे एका ओळखीच्या सण-परंपरेला नवीन …