Tuesday, October 06 2026 | 02:43:42 PM
Breaking News

Matribhumi Samachar

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक (डॉ.) माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री श्री कॉनरॅड के. संगमा यांनी मुंबईतील ईशान्य प्रदेश व्यापार आणि गुंतवणूक रोड शो मध्ये सहभाग नोंदवत, लोकांना भारताच्या ईशान्य भागात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

ईशान्य राज्य क्षेत्र विकास मंत्रालयाने (MDoNER) मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते.भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईत झालेल्या रोड शोने भारताच्या या आर्थिक केंद्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला, केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे मंत्री (MDoNER) ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक(डॉ.) …

Read More »

संरक्षण क्षेत्रातील नव्या सार्वजनिक उपक्रमांच्या(डीपीएसयूज)भूमिका आणि कार्ये याविषयी संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीचे संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पूर्वाश्रमीच्या आयुध निर्माण मंडळाच्या कॉर्पोरेटायजेशननंतर स्थापन झालेल्या नव्या डीपीएसयूच्या भूमिका आणि कार्ये यावर चर्चा झाली. यावेळी या समितीच्या सदस्यांना आर्थिक आकडेवारी, आधुनिकीकरण, भांडवली खर्च, निर्यात, नव्याने विकसित उत्पादने आणि सध्या …

Read More »

आस्था गोडबोले कार्लेकर यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालकपदाचा स्वीकारला कार्यभार

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सात प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. या अंतर्गत 6 राज्यांचा समावेश आहे. मंगळवार, 17 डिसेंबर 2024 रोजी आस्था गोडबोले कार्लेकर यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन आस्था …

Read More »

सी-डॉट आणि सिलिझियम सर्किट्स यांच्यात “LEO उपग्रह घटकांचे डिझाइन आणि विकास आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आर एफ फ्रंट एंड एप्लीकेशन स्पेसिफिक इंटीग्रेटेड सर्किट्स” साठी करार

स्वदेशात तयार केलेले अत्याधुनिक आणि पुढील पिढीचे दूरसंवाद तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारत सरकारच्या दूरसंचार विभागाअंतर्गत असलेले प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र,  सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉटचे) आणि आय आय टी हैदराबाद अंतर्गत फॅबलेस सेमीकंडक्टर आयपी आणि एसओसी स्टार्टअप सिलिझियम सर्किट्स प्रायव्हेट लिमिटेड, एफएबीसीआय …

Read More »

भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलने हस्तलिखित पत्रलेखनाची कला साजरी करणारा पत्र लेखन महोत्सव म्हणजेच “पत्र उत्सव 2.0” ची दुसरी आवृत्ती केली आयोजित

हाताने पत्र लिहिण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा देण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या “पत्र उत्सव 2.0” महोत्सवाची दुसरी आवृत्ती आज  17 डिसेंबर 2024 रोजी मुंबई जनरल पोस्ट ऑफिस (GPO) येथील वितरण कक्षात आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवात पत्र लेखन आणि अच्युत पालव कॅलिओग्राफी  विद्यालयाच्या अंतर्गत …

Read More »

महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाकडून जागतिक बुद्बिबळ विजेत्या डी.गुकेशचा विशेष कॅन्सलेशनद्वारे सन्मान

जागतिक बुद्बिबळ अजिंक्यपद जिंकणाऱ्या भारताच्या गुकेश डी. या बुद्धिबळपटूच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाने एका विशेष कॅन्सलेशनचे प्रकाशन केले. गुकेशने  फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद 2024 या स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून, सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता बनून इतिहास घडवला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र आणि …

Read More »

श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कार प्राप्त  श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले.  आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी  लिहिले आहे: “कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कारप्राप्त   श्रीमती तुलसी गौडा जी,यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे.आपले संपूर्ण जीवन त्यांनी,हजारो रोपे लावून निसर्गाचे संगोपन करत आपल्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जयपूर येथे ‘एक वर्ष-परिणाम उत्कर्ष’ या राज्य सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात झाले सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘ एक वर्ष-परिणाम उत्कर्ष’:राजस्थान राज्य सरकारची वर्षपूर्ती या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीबद्दल राज्य सरकार आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात जमलेल्या लाखो लोकांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या विकासकामांना नवी दिशा आणि गती …

Read More »

फ्रान्समधील मायोट इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख

फ्रान्समधील मायोटमध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,की भारत फ्रान्ससोबत खंबीरपणाने उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक्स पोस्टवर त्यांनी लिहिले आहे: “मायोट मध्ये चिडो …

Read More »

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठीचा लोगो शुभंकर आणि जर्सीचा लोकार्पण सोहळा

उत्तराखंड येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमासाठी लोगो, शुभंकर आणि जर्सी चा लोकार्पण सोहळा पार पडला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावून देशभरातील खेळाडूंमध्ये संवाद आणि क्रीडा स्वभावाची भावना वृद्धिंगत करत …

Read More »