नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः “मेघालयच्या स्थापनादिनी, या राज्याच्या जनतेला मी शुभेच्छा देत आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि जनतेची परिश्रमी वृत्ती यासाठी मेघालय ओळखले जाते. आगामी काळात या राज्याचा निरंतर विकास होत राहू देत …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (118 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज 2025 मधली पहिली ‘मन की बात’ होत आहे. तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल, दरवेळी ‘मन की बात’ महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते, पण यावेळी एक आठवडा आधीच म्हणजे, चौथ्या रविवार ऐवजी तिसऱ्या रविवारीच आपली भेट होत आहे; कारण पुढच्या आठवड्यातल्या रविवारी, ‘प्रजासत्ताक दिन’ आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या आत्ताच शुभेच्छा देतो. मित्रहो, यावेळीचा ‘प्रजासत्ताक दिन’ खूप खास …
Read More »ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहेः पंतप्रधान
ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. मायगव्हइंडियाकडून एक्सवर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणालेः “तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर करून ग्रामीण सक्षमीकरणाला चालना देत आहोत…”
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व लाभार्थ्यांसोबत साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 230 जिल्ह्यांमधील 50,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मालमत्ता धारकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मामित्व योजने अंतर्गत 65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पाच लाभार्थ्यांसोबत संवाद साधला आणि स्वामित्व योजनेविषयीचे त्यांचे अनुभव जाणून घेतले. मध्य प्रदेशातील सिहोर येथील स्वामित्व लाभार्थी मनोहर मेवाडा यांच्यासोबत संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांना स्वामित्व …
Read More »आत्मनिर्भर भारत : भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएलसोबत 2,960 कोटी रुपयांचा केला करार
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएल अर्थात भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत सुमारे 2,960 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2025 रोजी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि बीडीएलच्या अधिकाऱ्यांनी या …
Read More »सेना दिवस संचलन 2025 मध्ये अग्निवीर महिला संचलन पथक सहभागी होणार
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 15 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे सेना दिवस संचलन 2025 मध्ये अग्निवीर महिला संचलन पथक सहभागी होणार असून, भारतीय लष्करातील महिलांचा उल्लेखनीय प्रवास आणखी पुढे नेणार आहे. प्रजासत्ताक दिन संचलन 2024 च्या त्रि-सेना दल संचलन मधील संपूर्ण महिला पथकाच्या सहभागानंतरचा हा आणखी एक महत्त्वाचा …
Read More »पंतप्रधानांनी भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या सेना दिनाप्रीत्यर्थ भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे. भारतीय सेना हे दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे मूर्तिमंत प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. “सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक सुधारणा घडवून आणल्या असून आधुनिकीकरणावर …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर या प्रमुख युद्धनौकांचे (एक लढाऊ जहाज, एक विनाशिका आणि एक पाणबुडी) राष्ट्रार्पण
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या तीन आघाडीच्या युद्धनौका, आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगून पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च …
Read More »प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भाषिणीने पुरवली बहुभाषिक सुलभता
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुरु राहणाऱ्या महाकुंभमध्ये, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने,बहुभाषिक सुलभतेसाठी ‘भाषिणी’ या अँड्रॉइड अॅप्लिकेशनसमवेत समन्वय साधत तांत्रिक सहाय्य उपलब्ध केले आहे. ‘डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्युशन (हरवलेल्यांना शोधण्यासाठी डिजिटल उपाय): ‘डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्युशन’च्या माध्यमातून …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभाला केले संबोधित
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला. भारतीय हवामान विभागाचा दीडशे वर्षांचा प्रवास हा केवळ एका विभागाचा प्रवास नसून भारतातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे. असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय हवामान विभागाने …
Read More »
Matribhumi Samachar Marathi