Sunday, September 27 2026 | 03:09:54 AM
Breaking News

National

2025-26 हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला (MSP) मंजुरी

नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत, 2025-26 च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमती (MSP) मंजूर करण्यात आल्या. 2025-26 हंगामासाठी, कच्च्या तागाची (TD-3 श्रेणी) किमान आधारभूत किमत 5,650 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे ताग …

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (2021-24) योगदानाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाला दिली माहिती : भारताने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील परिणामांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे गाठला ऐतिहासिक टप्पा

नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या कालावधीत केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात आली. याशिवाय मातामृत्यू दर, बालमृत्यू दर, 5 वर्षांपेक्षा लहान बालकांचा मृत्यू दर , एकूण प्रजनन दर याविषयी माहिती देण्यात आली. तसेच क्षयरोग , मलेरिया, …

Read More »

पंतप्रधानांनी ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ चळवळीच्या 10 वर्षांचा टप्पा केला साजरा

आज ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ चळवळीच्या 10 वर्षांचा टप्पा साजरा करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ही चळवळ परिवर्तन घडवून आणणारी व जनतेच्या सहभागातून उभारलेली आहे. विविध स्तरांतील लोक या चळवळीत सहभागी झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ ही चळवळ लिंगभावविषयक पूर्वग्रह दूर करण्यात तसेच मुलींना सशक्त बनवण्यात महत्त्वाची ठरली असल्याचेही त्यांनी …

Read More »

महिला आणि बालविकास मंत्रालय बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचा 10 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. यंदा बेटी बचाओ, बेटी पढाओ (बीबीबीपी) योजनेचा 10 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय सज्ज झाले असून या माध्यमातून भारतात बालिकांचे रक्षण, शिक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या एका दशकाचे महत्त्व समोर आणले जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ उद्या(22 जानेवारी 2025) …

Read More »

प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 : राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची महाअंतिम फेरी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 चा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ 25 जानेवारी रोजी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत होणार …

Read More »

आत्मनिर्भर भारत : भारतीय सैन्यासाठी 47 T-72 ब्रिज लेईन्ग टँक खरेदी करण्यासाठी हेवी वेहिकल्स फॅक्टरी,एव्हीएनएल सोबत 1,561 कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी 47 टँक-72 ब्रिज लेइंग टँकच्या खरेदीसाठी आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या हेवी वेहिकल्स फॅक्टरीसोबत एकूण 1,560.52 कोटी रुपयांचा करार केला आहे. 21 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि एचव्हीएफ /एव्हीएनएल च्या वरिष्ठ …

Read More »

अमृत उद्यान 2 फेब्रुवारीपासून जनतेसाठी खुले होणार

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 2 फेब्रुवारी ते 30 मार्च 2025 या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. उद्यानाच्या देखभालीचा सोमवार हा वार वगळता, आठवड्यातील इतर वारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत लोक उद्यानाला भेट देऊ शकतात. उद्यान 5 फेब्रुवारी (दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानामुळे), 20 …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः “मेघालयच्या स्थापनादिनी, या राज्याच्या जनतेला मी शुभेच्छा देत आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि जनतेची परिश्रमी वृत्ती यासाठी मेघालय ओळखले जाते. आगामी काळात या राज्याचा निरंतर विकास होत राहू देत …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (118 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज 2025 मधली पहिली ‘मन की बात’ होत आहे. तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल, दरवेळी ‘मन की बात’ महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते, पण यावेळी एक आठवडा आधीच म्हणजे, चौथ्या रविवार ऐवजी तिसऱ्या रविवारीच आपली भेट होत आहे; कारण पुढच्या आठवड्यातल्या रविवारी, ‘प्रजासत्ताक दिन’ आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या आत्ताच शुभेच्छा देतो. मित्रहो, यावेळीचा ‘प्रजासत्ताक दिन’ खूप खास …

Read More »

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहेः पंतप्रधान

ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. मायगव्हइंडियाकडून एक्सवर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणालेः “तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर  करून ग्रामीण सक्षमीकरणाला चालना देत आहोत…”

Read More »