Tuesday, April 21 2026 | 07:35:17 AM
Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मधील संस्मरणीय क्षण केले सामाईक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 या मावळत्या वर्षातली महत्वपूर्ण कामगिरी आणि अविस्मरणीय ठरलेल्या घटनांचे महत्त्वपूर्ण टप्पे, सामाईक केले आहेत. X या समाज माध्यमावरच्या narendramodi_in हँडलच्या संदेशावर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान म्हणाले: “2024 एक संस्मरणीय वर्ष! 2024 या  सरत्या वर्षातील काही संस्मरणीय छायाचित्रे येथे आहेत.”   भारत : 1885 से 1950 (इतिहास …

Read More »

पंतप्रधानांनी डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील, असे नमूद केले. त्यांनी एक्सवरील एका पोस्ट मध्ये लिहिले: “संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या …

Read More »

राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM-K) ची उपलब्धी आणि उपक्रम : अन्न उद्योग नवोन्मेष आणि सहकार्यासाठी एक उल्लेखनीय वर्ष: वर्षअखेर पुनरावलोकन 2024

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024 राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM-K) ने 2024 मध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली असून अन्न-प्रक्रिया क्षेत्राची प्रगती करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे. तांत्रिक नवोन्मेषापासून ते जागतिक सहकार्यांना चालना देण्यापर्यंत, हे वर्ष संस्थेसाठी मोलाचे ठरले आहे. जागतिक खाद्य भारत 2024 मध्ये तांत्रिक नवोन्मेषाचे प्रदर्शन राष्ट्रीय …

Read More »

प्रजासत्ताक दिन -2025 वेळी आयोजित शिबिरात 917 मुलींसह 2,361 राष्ट्रीय कॅडेट कोअर उमेदवार होणार सहभागी

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024 राष्ट्रीय कॅडेट कोअरच्या  प्रजासत्ताक दिन (RD) -2025 शिबिराची सुरुवात, दिल्ली कँट येथील करीअप्पा परेड मैदानावर आज 30 डिसेंबर 2024 रोजी सर्व धर्मीय पूजनाने झाली. यात 917 गर्ल कॅडेट्स सहभागी होणार असून, या वर्षीच्या शिबिरात सर्वात अधिक मुली कॅडेट्स आहेत. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात देशातील सर्व …

Read More »

भारतीय कृषी संशोधन परिषदेत कृषी शास्त्रज्ञांच्या नियुक्तीसंदर्भातला अनियमिततेचा दावा निराधार : भारतीय कृषी संशोधन परिषद

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024 भारतीय कृषी संशोधन परिषदेमधील कृषी शास्त्रज्ञांच्या नेमणुकांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप असलेल्या तसेच याबाबतीत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या बातम्या दि. 27 डिसेंबर 2024  रोजी काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक जारी केले जात आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद ही भारत सरकारच्या कृषी आणि …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक  व्यक्त केला आहे. ‘एक्स’वर केलेल्या पोस्ट  मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे: “अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. एक महान दृष्टिकोन असलेले राजकारणी, ज्यांनी जागतिक शांतता आणि सलोख्यासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी …

Read More »

भारताच्या मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगासाठी भारताच्या पंतप्रधानांचे आवाहन: जागतिक मंचावर भारताची सर्जनशील शक्ती प्रदर्शित करण्यासाठी WAVES मध्ये सामील व्हा

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, ‘मन की बात’ च्या 117 व्या भागात, भारताच्या सर्जनशील आणि मनोरंजन क्षेत्रासाठी  महत्त्वाच्या ठरलेल्या टप्प्याची उत्साहवर्धक बातमी सांगितली.  राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जाहीर केले की भारत पुढील वर्षी 5 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES), ही जागतिक  दृकश्राव्य मनोरंजन  शिखर परिषद आयोजित करणार आहे. वेव्हज परिषद: भारताच्या सर्जनशील प्रतिभेसाठी …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया यशस्वी आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षे पूर्ण

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराने  (Ind-Aus ECTA) परस्पर वृद्धी आणि दोन्ही अर्थव्यवस्थांची पूरकता दृश्यमान करित दोन वर्षांचे उल्लेखनीय यश पूर्ण केले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया ECTA मध्ये लक्षणीयरीत्या प्रगत व्यापारी संबंध अंतर्भूत  असून त्यायोगे परस्परांच्या आर्थिक भागीदारीचा पाया मजबूत करत दोन्ही देशांमध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय आणि रोजगारासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. तिसऱ्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (117 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

नवी दिल्ली, डिसेंबर 29,2024 माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार!  2025 हे वर्ष तर आता आलंच आहे, दरवाजावर येऊन ठेपलं आहे.   26 जानेवारी 2025 रोजी आपली राज्यघटना लागू होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत.  आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे.  आपल्या राज्यघटनाकारांनी आपल्या हाती सुपूर्द केलेली राज्यघटना, काळाच्या प्रत्येक निकषावर सिद्ध झाली आहे. राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश- दीपस्तंभ आहे, मार्गदर्शक आहे.   भारताच्या राज्यघटनेमुळेच …

Read More »

महिलांच्या 2024 फिडे जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या हम्पी कोनेरूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हंपी कोनेरूचे 2024 फिडे (FIDE- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) महिला जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.  लाखो लोकांना प्रेरणादायक ठरणाऱ्या तिच्या धैर्य आणि निर्धाराचे, त्यांनी कौतुक केले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या X समाज माध्यमावरील टिप्पणीला प्रतिसाद देताना, ते लिहितात: “2024 फिडे महिलांची जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा  जिंकल्याबद्दल @humpy_koneru चे अभिनंदन!  तिचे धैर्य आणि निर्धार …

Read More »