निवृत्ती वेतन वितरण सेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत, ईपीएफओने डिसेंबर 2024 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत नवीन केंद्रीकृत निवृत्ती वेतन वितरण प्रणाली (सीपीपीएस) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली. ईपीएफओच्या सर्व 122 पेन्शन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर 2024 साठी सुमारे 1570 कोटी रुपये पेन्शन वितरित करण्यात आले. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमचा (सीपीपीएस) पहिला प्रायोगिक उपक्रम ऑक्टोबर, 2024 मध्ये …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनाला भेट
पुणे, दिनांक ३ जानेवारी २०२५ पुण्यामध्ये आर्मी दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरोतर्फे नागरिकांसाठी सैन्य विषयक माहिती आणि चित्र प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट दिली. यामध्ये भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्रे आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. सोबतच डिजीटल मीडियाचा उपयोग करुन आकर्षक आणि मनोरंजक …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयलंड डेव्हलपमेंट एजन्सीची (आयडीए) सातवी बैठक संपन्न
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे आयलंड डेव्हलपमेंट एजन्सी (आयडीए), अर्थात बेट विकास संस्थेची सातवी बैठक पार पडली. बैठकी दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. गृह मंत्रालय, अंदमान आणि निकोबार बेटे प्रशासन आणि लक्षद्वीप प्रशासनाने …
Read More »राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग
राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग असून हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 114 आणि ईशान्य विभागातील 178 छात्रांचा समावेश आहे असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (डीजीएनसीसी) लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 3 जानेवारी 2025 रोजी, दिल्ली कँट येथील पत्रकार परिषदेत सांगितले. युवक आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत 18 मित्र …
Read More »सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ आहेत , तसेच त्या शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्राच्या आद्य प्रवर्तक आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश …
Read More »राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. अतुलनीय शौर्य आणि सामरिक तेज दाखवून त्यांनी वसाहतवादी राजवटीविरुद्ध वीरतापूर्ण लढा दिला, असा उल्लेख मोदींनी केला. X वर एका पोस्टमध्ये मोदींनी लिहिले की: “शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे भावपूर्ण स्मरण! त्यांनी अतुलनीय शौर्य आणि सामरिक तेज दाखवत वसाहतवादी राजवटीविरुद्ध वीरतापूर्ण लढा दिला. येणाऱ्या पिढ्यांना त्यांनी दडपशाहीविरुद्ध उभे राहण्यासाठी आणि …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधितही केले. त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अफाट संधींचे वर्ष ठरेल आणि हे वर्ष देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल, असा …
Read More »पंतप्रधान 4 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे करणार उद्घाटन
नवी दिल्ली – दि. 03 जानेवारी, 2025 नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये उद्या – 4 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत. ग्रामीण भारताची उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करणारा, हा महोत्सव 4 ते 9 जानेवारी या कालावधीत होणार आहे. विकसित भारत 2047 साठी एक लवचिक ग्रामीण भारत निर्माण करणे …
Read More »हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटर येथे आज वेदांताच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या उद्घाटनपर भाषणात उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, “आपली संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असून, ती सर्व प्रकारे एकमेवाद्वितीय आहे. उपरोधाची आणि खेदाची गोष्ट …
Read More »बंगळुरू येथे निम्हान्सच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (3 जानेवारी, 2025) बेंगळुरू येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निम्हान्स) संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात सहभागी झाल्या. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, अपवादात्मक रूग्ण सेवेसह अभिनव संशोधन आणि कठोर शैक्षणिक कार्यक्रमामुळे निम्हान्स हे मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्सच्या क्षेत्रात एक अग्रणी संस्था बनली आहे. समुदाय-आधारित मानसिक आरोग्य …
Read More »
Matribhumi Samachar Marathi