बुधवार, नवंबर 13 2024 | 05:34:53 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / भारतीय नौदल प्रश्नमंजुषा – थिंक 2024 ची आयएनए येथे एका शानदार अंतिम फेरीसह सांगता

भारतीय नौदल प्रश्नमंजुषा – थिंक 2024 ची आयएनए येथे एका शानदार अंतिम फेरीसह सांगता

Follow us on:

भारतीय नौदलाने भारताची  प्रगती आणि ‘विकसित  भारत’  संकल्पनेचा उत्सव असलेल्या  थिंक 2024 (THINQ 2024) प्रश्नमंजुषेचे  8 नोव्हेंबर 24 रोजी  अभिमानास्पद आयोजन केले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी एक आदर्श ठिकाण  आणि भारताचा सागरी वारसा आणि उत्कृष्टतेप्रति समर्पणाचे प्रतीक असलेल्या एळीमाला स्थित भारतीय नौदल अकादमीच्या नयनरम्य नालंदा ब्लॉक येथे या स्पर्धेची भव्य अंतिम फेरी पार पडली.  शाळकरी मुले, नौदल कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, निवृत्त नौदल अधिकारी , मान्यवर अतिथी  आणि आयएनए चे प्रशिक्षणार्थी यांचा समावेश असलेल्या उत्साही प्रेक्षकांसमोर ही अटीतटीची अंतिम फेरी पार पडली.  ही बौद्धिक लढाई होती ज्यात सहभागी झालेल्या  स्पर्धकांच्या ज्ञानाचा कस लागला आणि प्रेक्षकांनाही खिळवून ठेवले.

थिंक 2024 साठी झालेल्या अटीतटीच्या स्पर्धेनंतर जयपूरचे जयश्री पेरीवाल हायस्कूल  विजेते ठरले  तर चेन्नईचे बी व्ही भवनचे विद्याश्रम उपविजेते ठरले. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशनच्या अध्यक्ष शशी त्रिपाठी यांच्या हस्ते या उल्लेखनीय कार्यक्रमाच्या यशात योगदान देणाऱ्या विजेते, सहभागी स्पर्धक आणि शाळांना गौरवण्यात आले.

थिंक 2024 ने बौद्धिक आदानप्रदान आणि स्पर्धेसाठी राष्ट्रीय मंच उपलब्ध करून भारतातील तल्लख युवा  मनांची अपवादात्मक प्रतिभा प्रदर्शित केली आहे . थिंक ही केवळ प्रश्नमंजुषा नाही तर ही स्पर्धा युवकांचा  प्रवास  आणि विकसित भारत’ प्रति भारतीय नौदलाच्या  योगदानाचा दाखला आहे. विकासाच्या दिशेने भारताचा प्रवास सुरू असून  स्पर्धात्मक भावना जोपासत आणि नौदलाच्या जीवनपद्धतीला प्रेरित करत  थिंक 2024 (THINQ 2024 )  सारखे उपक्रम युवा मनाला आकार देण्यात  महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

स्वीप उपक्रम : प्रत्येक मतदार मतदान करणार

छत्रपती संभाजीनगर,जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ आज रवाना झाला. जिल्हाधिकारी …