गुरुवार, नवंबर 14 2024 | 10:20:30 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / एसकेए वेधशाळा उभारणीत सदस्य देश म्हणून सहभागी झाल्याबद्दल भारतातर्फे आनंद व्यक्त

एसकेए वेधशाळा उभारणीत सदस्य देश म्हणून सहभागी झाल्याबद्दल भारतातर्फे आनंद व्यक्त

Follow us on:

एसकेएओ अर्थात ‘स्क्वेयर किलोमीटर ॲरे’  वेधशाळा उभारणीच्या प्रकल्पात भारताला नुकत्याच मिळालेल्या सदस्यत्वाबद्दल आज 13 नोव्हेंबर 2024 रोजी पुणे येथील राष्ट्रीय रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) या संस्थेत आयोजित कार्यक्रमात आनंद साजरा करण्यात आला.केंद्रीय अणुउर्जा विभाग (डीएई) सचिव, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) सचिव तसेच एसकेएओच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखालील लहान शिष्टमंडळ यांसह अनेक ज्येष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. एसकेए-भारत कॉन्सोर्टियम मधील शिक्षण संस्थांसह देशातील इतर शैक्षणिक संस्थांचे सदस्य, उद्योग विश्वातील भागीदार आणि इतर अनेक मान्यवर देखील हा सोहोळा साजरा करण्यासाठी उपस्थित होते.

भारताने एसकेएओ स्थापना करार या संस्थापक दस्तऐवजावर स्वाक्षरी करून आणि त्याला मंजुरी देऊन जुलै 2024 मध्ये औपचारिकरीत्या एसकेएओ मंडळात प्रवेश केला. वर्ष 2031 पर्यंत एसकेएओ प्रकल्पातील भारताच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी भारताने यापूर्वीच सुमारे 1250 कोटी रुपयांच्या लक्षणीय योगदानासह या आंतरराष्ट्रीय महाप्रकल्पातील सहभागाला मंजुरी दिली आहे.

एसकेएओ ही आंतरसरकारी संघटना असून विश्वाविषयीची आपली समज रुपांतरीत करणे आणि जागतिक सहयोग तसेच नवोन्मेष यांच्या माध्यमातून समाजाला त्याचा लाभ मिळवून देणे या उद्देशासह अत्याधुनिक रेडिओ टेलिस्कोपची उभारणी तसेच परिचालन करण्यासाठी जगभरातील देशांनी एकत्र येऊन हाती घेतलेला हा उपक्रम आहे.

  

याप्रसंगी डीएसटीचे सचिव प्रा.अभय करंदीकर म्हणाले, “वेगवेगळ्या प्रकारची अत्याधुनिक वैज्ञानिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगातील सर्वात मोठी आणि सर्वात संवेदनशील रेडिओ ॲस्ट्रोनॉमी वेधशाळा उभारण्यासाठीच्या एसकेए वेधशाळा (एसकेएओ) प्रकल्पातील भागीदार झाल्याचा डीएसटीला अभिमान आहे.”

एसकेएओ सदस्य देशांमध्ये असलेल्या जागतिक नेटवर्कचा भाग म्हणून एसकेए क्षेत्रीय केंद्र (एसआरसी) उभारण्याचे देखील नियोजन भारत करत आहे. भारतात एसआरसी उभारणीच्या प्रयत्नांचे समन्वयन करणारे एनसीआरए-टीआयएफआरचे प्राध्यापक योगेश वडनेरकर म्हणाले, “ॲस्ट्रोनॉमी क्षेत्रातील समुदायासाठी एसकेएओ डाटा उत्पादनांची प्रक्रिया, साठवण आणि उपलब्धता करून देण्याचे कार्य एसआरसी करेल.”

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

“कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी” केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण’ कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कोचिंग (खाजगी शिकवणी संस्‍था-केंद्र) क्षेत्रात पारदर्शकता राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल …