सोमवार, नवंबर 18 2024 | 12:08:28 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव

Follow us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नायजेरिया दौऱ्यावर असून  दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी त्यांच्या सन्मानार्थ नायजेरियाच्या स्टेट हाऊसमध्ये आयोजित समारंभात नायजेरियाचे राष्ट्रपती महामहिम बोला अहमद तिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल तसेच भारत आणि नायजेरियातील संबंध वृद्धींगत करण्यासाठी दिलेल्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वात भारताने जागतिक महासत्ता म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनशील कारभारामुळे सर्वांसाठी एकता आणि शांतता प्रस्थापित केली आहे तसेच परस्पर सामायिक समृद्धी वाढली आहे, असे या पुरस्कारानिमित्त पंतप्रधानांना प्रदान केल्या केलेल्या मानपत्रात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर, हा पुरस्कार भारताच्या जनतेला तसेच भारत आणि नायजेरिया यांच्यामधील दीर्घकालीन, ऐतिहासिक मैत्रीला अर्पण केला. या पुरस्काराच्या निमित्ताने नायजेरियाने घेतलेली दखल म्हणजे भारत आणि नायजेरिया या दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी आणि ग्लोबल साऊथ अंतर्गत येत असलेल्या देशांच्या आकांक्षांप्रती दोन्ही देशांची परस्पर सामायिक वचनबद्धता अधोरेखित करते अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  व्यक्त केली.

1969 नंतर नायजेरियाच्या या पुरस्काराने सन्मानित केले गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले आहेत.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

डीआरडीओकडून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने  (डीआरडीओ) काल( १६ नोव्हेंबर २०२४) रात्री ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे …