शनिवार, अप्रैल 12 2025 | 07:29:15 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वकविद्यालयात संविधान दिवस साजरा

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वकविद्यालयात संविधान दिवस साजरा

Follow us on:

केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ वर्षभराचा ऐतिहासिक उत्सव सुरू करण्याची घोषणा केली आहे. या निम्मिताने वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. सकाळी 10:00 वाजता प्रशासकीय भवनात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्याथत आले. कुलगुरू प्रो. कृष्ण कुमार सिंह यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले, त्याची पुनरावृत्ती उपस्थितांनी केली. याप्रसंगी कुलसचिव प्रो. आनन्दा पाटील, प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल, प्रो. कृपा शंकर चौबे, प्रो. गोपाल कृष्ण ठाकुर, प्रो. बंशीधर पांडे, प्रो. जनार्दन कुमार तिवारी, डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, डॉ. रामानुज अस्थाना, डॉ. बालाजी चिरडे, डॉ. जयंत उपाध्याय, आनंद भारती, डॉ. प्रकाश नारायण त्रिपाठी, विनोद वैद्य, डॉ. राजेश्वर सिंह, राजेश अरोड़ा, राजेश यादव, बी. एस. मिरगे यांच्यासह शिक्षक, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. कुलगुरू प्रो. सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. ही रॅली गांधी हिल्स, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, पंजाबराव देशमुख कॉलनीमार्गे विश्व विद्यालयात पोहोचली. रॅलीचा समारोप डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी अकादमिक भवन येथे झाला.

रॅलीमध्ये ‘संविधान है देश की शान, यही बनाता भारत महान’, ‘संविधान की शक्ति पहचानो, अपने अधिकारों को जानो’, ‘जिसने दिया हमें अधिकार, उसकी रक्षा करना है हमारा कर्तव्यस बार-बार’, ‘लोकतंत्र की पहचान है, संविधान हमारी जान है’, ‘संविधान का सम्माअन करों, भारत का उत्थाान करों’ आदी घोषणा देण्यात आल्या.

रॅलीच्या’ यशस्वीतेसाठी डॉ. युवराज खरे, डॉ. दिव्या शुक्ला, डॉ. परमानन्द. राठोड, डॉ. अभिषेक त्रिपाठी, डॉ. विजय कुमार सिंह, डॉ.अभिषेक सिंह, संगीता मालवीय, हेमंत दुबे, मिथिलेश राय, सुधीर खरकटे, राकेश झाडे, पीयूष लांबाडे आदींनी सहकार्य केले.

26 नोव्हेंबर 1949 रोजी, भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली, जी 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आणि भारतीय इतिहासातील एका नवीन युगाची सुरुवात झाली. हा दिवस महत्त्वाचा आहे, या दिवशी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाचा स्वीकार करण्यात आला. गेल्या 75 वर्षांत, संविधानाने देशाच्या प्रगतीला आकार देणारी मार्गदर्शक चौकट म्हणून काम केले आहे. यानिमित्त भारत सरकारने एक विशेष वेबसाइट constitution75.com विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे नागरिकांना संविधानाच्या वारशाशी जोडण्यासाठी तयार केले आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

नंदन झा ने एसओजी ग्रैंडमास्टर्स सीरीज़ वेस्ट जोन फाइनल के लिए शानदार रेड कार्पेट इवेंट की अगुआई की

अजिंक्य रहाणे और अंगद बेदी ने बढ़ाई कार्यक्रम की शोभा मुंबई, मार्च 2025: एसओजी ग्रैंडमास्टर्स …