शुक्रवार, जनवरी 10 2025 | 01:10:52 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / सोलापूर शहर राजभाषा अंमलबजावणी समितीची सहामाही बैठक संपन्न

सोलापूर शहर राजभाषा अंमलबजावणी समितीची सहामाही बैठक संपन्न

Follow us on:

सोलापूर जिल्ह्यात केंद्रीय कार्यालयांमध्ये राजभाषा हिंदीच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राजभाषा अंमलबजावणी समितीतर्फे सहामाही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, राजेंद्र प्रसाद वर्मा, सहायक संचालक, राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, संजीव कुमार, अध्यक्ष, नार्कस, नीरज कुमार डोहरे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, तपन कुमार बंदोपाध्याय, मुख्य महाव्यवस्थापक, एनटीपीसी आणि विनय प्रसाद साव, सदस्य सचिव उपस्थित होते.

या बैठकीत केंद्रीय कार्यालयांत राजभाषेच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि आगामी काळात हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार तसेच प्रगतीसाठी लागू करण्यात येणाऱ्या योजनांवर चर्चा करण्यात आली.

नीरज कुमार दोहरे यांनी सांगितले की रेल्वेच्या विविध परिमंडळांमध्ये हिंदी भाषेचा वापर आणि प्रसार सातत्याने वाढत आहे आणि राजभाषा हिंदीमध्ये चांगले काम चालत आहे.

तपन कुमार बंदोपाध्याय यांनी एनटीपीसीच्या विविध विभागात हिंदी भाषेवर आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

राजेन्द्र प्रसाद वर्मा यांनी हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याविषयी सविस्तर माहिती दिली.

संजीव कुमार यांनी सांगितले की 2023-24 या वर्षात नगर राजभाषा अंमलबजावणी समितीकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना विविध स्पर्धांच्या माध्यमातून शासकीय कामांत हिंदीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

मध्य रेल्वे सोलापूर विभाग, पीएम श्री केंद्रीय विद्यालय, एनटीपीसी लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भीमा उपविभाग केंद्रीय जल आयोग, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन्स, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक , युनियन बँक ऑफ इंडियाची केंद्रीय कार्यालये, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ऑल इंडिया रेडिओ सेंटर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांना 2023-24 मध्ये राजभाषा   हिंदीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राजभाषा  ढाल आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन आणि हिंदी पंधरवड्याच्या निमित्ताने 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत केंद्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन शब्दसंग्रह, हिंदी प्रारुप लेखन, वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास यादव यांनी केले तर दिलीपकुमार यादव यांनी आभार प्रदर्शन केले. सदस्य सचिव विनय प्रसाद साव यांनी अध्यक्षस्थान भूषवले.

या बैठकीत 30 पेक्षा अधिक केंद्रीय कार्यालये आणि बँकाचे विभागप्रमुख, राजभाषा अधिकारी आणि शहरातील कर्मचारी सहभागी झाले.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …