नवी दिल्ली, 7 जुलै 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 07 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे महानियंत्रक, संरक्षण लेखा विभागाच्या (डीएडी) परिषदेला संबोधित केले. त्यांनी सशस्त्र दलांची परिचालन सज्जता आणि आर्थिक तत्परता यांना बळकटी देण्यात विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख केला आणि आपल्या सैन्याचे शौर्य …
Read More »केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे बिमस्टेक देशांसाठी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्रात कर्करोग उपचारासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
मुंबई, 7 जुलै 2025. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) आज 07 जुलै 2025 रोजी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्र येथे बिमस्टेक (बहुक्षेत्रीय तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्यावर आधारित बंगालच्या उपसागराशी संबंधित उपक्रम) देशांसाठी टाटा मेमोरियल केंद्रात कर्करोग उपचारासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत …
Read More »केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पुण्यात ‘एबीसी प्रो बास्केटबॉल लीग’ च्या चौथ्या आवृत्तीचा केला प्रारंभ
नवी दिल्ली, 7 जुलै 2025. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत काल, 6 जुलै 2025 रोजी पुण्यातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियममध्ये एबीसी प्रो बास्केटबॉल लीगच्या चौथ्या हंगामाचे उद्घाटन झाले. सक्षम युवक आणि चैतन्यशील क्रीडा संस्कृती वर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ दृष्टीकोनाला आणि ‘खेलो भारत …
Read More »पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हिअर मिली यांची घेतली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम जेव्हिअर मिली यांची भेट घेतली. पंतप्रधान कासा रोझादामध्ये पोहोचले, तेव्हा राष्ट्राध्यक्ष मिली यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. काल बुएनोस आयर्समध्ये आगमनानंतर पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ही भेट विशेष महत्त्वाची आहे, कारण 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला झालेली भारतीय पंतप्रधानांची ही पहिली द्विपक्षीय भेट आहे. भारत-अर्जेंटिना संबंधांचे हे …
Read More »संरक्षण लेखा विभागाने 7 जुलै रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या नियंत्रक परिषद 2025 चे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
संरक्षण लेखा विभागाने (डीएडी) 7 ते 9 जुलै 2025 दरम्यान नवी दिल्लीतील डीआरडीओ भवनातील डॉ. एसके कोठारी सभागृहात नियंत्रक परिषद 2025 चे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन सात जुलै रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, तिन्ही सेना दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, आर्थिक सल्लागार (संरक्षण सेवा) …
Read More »सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने काल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने केले जप्त
सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतील, झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे दि. 5 जुलै रोजी केलेल्या केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये प्रवाशांकडून तस्करी केला जात असलेला 11 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त केला. या अंतर्गत पहिल्या प्रकरणातून 9.662 किलोग्रॅम वजनाचा, 9.662 कोटी रुपये किमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आला. तसेच दुसऱ्या प्रकरणात वन्यजीव (जिवंत आणि मृत प्राणी) जप्त …
Read More »जे. पी. नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आरोग्य सेवा अधिकारी आणि वैद्यकीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप; आयुष्मान भारत नोंदणी वाहनांना हिरवा झेंडा
केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दिल्लीत आरोग्य सेवा अधिकारी आणि वैद्यकीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी उपस्थित असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आयुष्मान भारत नोंदणी व्हॅन्सना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नड्डा म्हणाले, “हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे कारण …
Read More »सप्ततारांकित आणि पंचतारांकित खाणींचा गौरव समारंभ
खाण मंत्रालयांतर्गत असलेले भारतीय खाण खाते , 2023-24 वर्षासाठी देशभरातल्या 7 आणि 5 तारांकित खाणींच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. 7.07.2025 रोजी जयपूर इथे या गौरव कार्यक्रमात विविध मान्यवर, भागधारक आणि निमंत्रित पाहुणे उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमाला, केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाण्यास संमती दर्शवली आहे आणि राजस्थानचे …
Read More »पंतप्रधानांच्या त्रिनिदाद व टोबागो दौऱ्याबाबतचे संयुक्त निवेदन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 आणि 4 जुलै 2025 दरम्यान त्रिनिदाद व टोबागोला भेट दिली. त्रिनिदाद व टोबागोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेस्सर यांनी पंतप्रधान मोदी यांना या भेटीचे निमंत्रण दिले होते. गेल्या २६ वर्षांमधील त्रिनिदाद व टोबागोचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. भारतीय नागरिक त्रिनिदाद व टोबागो देशात स्थलांतरित झाल्याला 180 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून …
Read More »सुरक्षेसाठी ग्राहकांना फक्त भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे केंद्राचे आवाहन
भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) तर्फे देशभरातील ग्राहकांना केवळ बीआयएस-प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, विभागाने बीआयएस प्रमाणपत्राशिवाय हेल्मेटचे उत्पादन किंवा विक्री करण्याविरुद्ध कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय रस्त्यांवर 21 कोटींहून अधिक दुचाकी वाहने असल्याने, दुचाकीस्वारांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत …
Read More »
Matribhumi Samachar Marathi