Sunday, September 27 2026 | 04:58:11 AM
Breaking News

National

आयएनएस अर्नाळा भारतीय नौदलात दाखल; विशाखापट्टणमच्या नाविक तळावर सरसेनाध्‍यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत अर्नाळा चे जलावतरण

नवी दिल्ली, 18 जून 2025. भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडमध्ये ‘आयएनएस अर्नाळा’ या पहिल्या स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौकेतील शॅलो वॉटर क्राफ्ट 18 जून 2025 रोजी नौदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये दाखल झाली. पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी आयोजित केलेल्या या समारंभात वरिष्ठ नौदल अधिकारी, …

Read More »

औषध मानके आणि परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता यावर जागतिक सहकार्य मजबूत करणे हे या मंचाचे उद्दिष्ट

नवी दिल्ली, 16 जून 2025 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज भारतीय औषधकोश आयोगाने  (आयपीसी) आयोजित केलेल्या दुसऱ्या धोरणकर्त्यांच्या मंचाच्या उद्घाटन सत्रात मुख्य भाषण केले.भारतीय औषधकोशाची ओळख करून देण्याच्या आणि प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजना  (PMBJP) या परवडणाऱ्या औषध उपक्रम – क्षेत्रातील प्रमुख …

Read More »

केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते चेन्नई इथे गरुड एअरोस्पेसच्या स्वदेशी कृषी ड्रोन प्रणालीचे आणि 300 सर्वोत्कृष्टता केंद्रांचे उद्घाटन

केंद्रीय ग्राम विकास मंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते आज चेन्नई इथे गरुड एअरोस्पेसच्या स्वदेशी कृषी ड्रोन निर्मिती केंद्राचे उद्घाटन झाले. पासवान यांच्या हस्ते 300 सर्वोत्कृष्टता केंद्रांचेही उद्घाटन करण्यात आले. गरुड एअरोस्पेसच्या डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण (टीटीटी) उपक्रमाचा प्रारंभदेखील पासवान यांच्या हस्ते झाला. भारत ड्रोन संघटनेच्या (बीडीए) प्रमुख सदस्यांनी या महत्त्वाच्या उपक्रमासाठी सहाय्य …

Read More »

आज नारी शक्ती विकसित भारताच्या संकल्पात सक्रियपणे सहभागी होत विविध क्षेत्रांमध्ये उदाहरणे निर्माण करत आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर सरकारचे लक्ष अधोरेखित करून विकसित भारताच्या प्रवासात महिलांनी बजावलेल्या परिवर्तनकारी भूमिकेवर प्रकाश टाकला आहे. पंतप्रधान म्हणाले की, आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज, त्या केवळ विकसित भारत घडवण्याच्या संकल्पात सक्रिय भागच घेत नाहीत, तर शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात …

Read More »

भारताने 29 देशांना उपयुक्त ठरणारी त्सुनामी इशारा यंत्रणा स्थापन केली : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद 2025 ला संबोधित केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद 2025 चे युरोपात प्रथमच आयोजन होत आहे याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी या परिषदेतील सहभागींचे स्वागत केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ईमॅन्युएल मॅक्रोन …

Read More »

येत्या काळात शेतकरी कल्याणाचे आमचे प्रयत्न अधिक जोमाने जारी राहतील : पंतप्रधान

कृषी समुदायासाठी सन्मान तसेच समृद्धीचा महत्वाचा टप्पा गाठत गेल्या 11 वर्षांत सरकारने राबवलेल्या शेतकरी-हिताच्या उपक्रमांचा सर्वदूर पोहोचलेला परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी तसेच किसान पीक विमा यांसारख्या  महत्त्वाच्या उपक्रमांवर भर देऊन शेतकरी कल्याणासाठी सरकारने उचललेली अत्यंत महत्वाची पावले असे याचे वर्णन त्यांनी केले. किमान हमीभावात  …

Read More »

भारताला नक्षल मुक्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध : अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नक्षल विरोधी कारवाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि या कारवाईमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, भारताला नक्षलवादाच्या संकटापासून मुक्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “नुकत्याच झालेल्या …

Read More »

जम्मू आणि काश्मीर हे भारताच्या मुकुटातील मौल्यवान रत्न आहे : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 46,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. शूर वीर जोरावर सिंग यांच्या भूमीला अभिवादन करताना ते म्हणाले की आजचा कार्यक्रम हा भारताची एकता आणि दृढनिश्चयाचा भव्य उत्सव आहे. माता वैष्णो देवीच्या आशीर्वादाने, काश्मीर खोरे आता भारताच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले …

Read More »

आम्ही आमच्या युवा शक्तीला झळाळी देण्यासाठी नेहमीच सर्व शक्य संधी देऊ, ते विकसित भारताचे प्रमुख निर्माते आहेत: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या युवकांच्या जागतिक कामगिरीवर प्रकाश टाकला आणि सांगितले की, भारताच्या युवकांनी जागतिक स्तरावर एक ठसा उमटवला आहे. स्टार्टअप्स, विज्ञान, क्रीडा, सामुदायिक सेवा आणि संस्कृती यासह विविध क्षेत्रांमध्ये तरुण भारतीयांनी दिलेल्या असाधारण योगदानाची दखल मोदी यांनी घेतली. “गेल्या 11  वर्षांत, आपण अशा अनेक उल्लेखनीय घटना पाहिल्या …

Read More »

गेल्या 11 वर्षात, आमच्या सरकारचे प्रत्येक पाऊल गरिबांची सेवा, सुशासन आणि कल्याणासाठी समर्पित आहे : नरेंद्र मोदी

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारची गरीब कल्याणासाठी असलेली अतूट बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशात परिवर्तनकारी आणि सर्वसमावेशक शासनाची 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ते म्हणाले की, सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि समावेशकतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका कनवाळू सरकारने 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. …

Read More »