रविवार, दिसंबर 22 2024 | 07:06:44 PM
Breaking News
Home / अन्य समाचार / केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हिरे क्षेत्रातील ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या दिशेने मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी भागधारकांच्या सल्लागार बैठकीचे केले आयोजन

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हिरे क्षेत्रातील ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या दिशेने मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी भागधारकांच्या सल्लागार बैठकीचे केले आयोजन

Follow us on:

हिरे क्षेत्रासाठी योग्य शब्दावलीचा वापर होण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हिरे क्षेत्रातील ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासंदर्भात भागधारकांच्या सल्लावजा बैठकीचे आयोजन केले. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (सीसीपीए) मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या क्षेत्रातील महत्त्वाचे भागधारक उद्योग तसेच तज्ञ एकत्र आले.

हिरे क्षेत्रात प्रमाणित शब्दावलीचा अभाव आणि अपुऱ्या प्रकटीकरण पद्धतींच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या समस्यांमुळे ग्राहकांचा गोंधळ उडणे आणि दिशाभूल करणाऱ्या पद्धती, विशेषतः नैसर्गिकरित्या प्राप्त हिरे आणि प्रयोगशाळेत निर्मित हिरे यांच्यात फरक करण्याच्या बाबतीतील पद्धती अमलात येणे अशा घटना होत होत्या.

तसेच, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) मधील मानक आयएस 15766:2007 मध्ये म्हटले आहे की “हिरा” ही संज्ञा केवळ नैसर्गिकरित्या सापडलेल्या हिऱ्यांसाठीच वापरण्यात यावी. कृत्रिम हिऱ्यांना कोणतीही विविक्षित पात्रता नसताना “हिरे” म्हणता येणार नाही तसेच कोणत्याही प्रकारची उत्पादन पद्धत किंवा कोणत्याही प्रकारचे साहित्य वापरून हिरे निर्माण केले असले तरीही त्यांच्यासाठी “कृत्रिम हिरे” अशी स्पष्ट संज्ञा वापरणे अनिवार्य आहे. बाजारात अशा हिऱ्यांविषयी स्पष्टता राखण्यासाठी, नैसर्गिक हिऱ्यांच्या बरोबरीने कृत्रिम हिऱ्यांची प्रतवारी करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

ग्राहक संरक्षण कायदा,2019 अंतर्गत, चुकीच्या व्यापार पद्धतींना प्रतिबंध करून आणि हिरे उद्योगात पारदर्शक लेबलिंग सुनिश्चित करून ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी मजबूत कायदेशीर चौकट निर्माण करण्यात आली आहे. ग्राहकांना गोंधळात टाकणारी वर्णने करणे  किंवा महत्त्वाची माहिती गाळणे यांवर निर्बंध घालण्यात आला आहे.

ग्राहक संरक्षणात वाढ करण्याच्या दृष्टीने नैतिक विपणन पद्धती आणि सुसंगत शब्दावली यांच्या गरजेबाबत उद्योगांनी सहमतीने भर दिला. खालील बाबतीत सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे प्रस्तावित करण्यात आली आहेत:

  • हिऱ्यांचा उगम आणि उत्पादन प्रक्रिया यांचा निर्देश असणारे स्पष्ट लेबलिंग आणि सर्व हिऱ्यांचे प्रमाणीकरण
  • प्रयोगशाळेत तयार झालेल्या उत्पादनांसाठी “नैसर्गिक” अथवा “अस्सल” अशा दिशाभूल करणाऱ्या शब्दांच्या वापरावर निर्बंध
  • अनियंत्रित संस्थांच्या उदयाला लगाम घालत हिरे तपासणी प्रयोगशाळांचे नियमन आणि प्रमाणीकरण यासाठी योग्य मान्यता प्रणाली

पारदर्शक आणि ग्राहक-केंद्री हिरे बाजाराच्या उभारणीसाठी ही सल्लागार बैठक म्हणजे महत्त्वाचे पाऊल होते. हिरे उद्योगामध्ये; पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्राहक संरक्षण यांची सुनिश्चिती करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) लवकरच मजबूत आराखड्याची सुरुवात करणार आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …