बुधवार, अक्तूबर 30 2024 | 10:28:25 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / कर्मयोगी सप्ताह आणि कर्मयोगी मोहीम

कर्मयोगी सप्ताह आणि कर्मयोगी मोहीम

Follow us on:

भारताच्या नागरी सेवांचे आधुनिकीकरण करण्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे “कर्मयोगी सप्ताह” – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन केले. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सतत शिकण्याच्या आणि क्षमता बांधणीच्या संस्कृतीचे जतन करत तसेच आपली राष्ट्रीय सेवा उद्दिष्टे पुन्हा साकार करण्यासाठी प्रेरित आणि उत्साही करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम एक मंच म्हणून कार्यरत राहील. सुमारे 30 लाखांपेक्षा जास्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आजीवन शिक्षण आणि स्व-सुधारणा करण्याची कटीबद्धता प्रस्थापित करून ‘एक सरकार’ दृष्टीकोन वाढवणे हे आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

कर्मयोगी सप्ताह: आजीवन शिक्षणासाठी कटीबद्धता

19 ते 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत आठवडाभर चाललेला आणि आता 27 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिला गेलेला कर्मयोगी सप्ताह शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सतत शिकण्याचा वार्षिक उत्सव म्हणून आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय उद्दिष्टे आणि सेवा मोहीमेत संरेखित करणे

मंत्रालये आणि इतर क्षेत्रांमध्ये क्षमता-निर्मितीला सातत्याने प्रोत्साहन देणे

सक्रिय सहभाग आणि प्रतिसादासह एकसंध शिक्षण परिसंस्था तयार करणे

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, कर्मयोगी सप्ताहातील प्रत्येक सहभागी कर्मचारी राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात किमान 4 तासांच्या सक्षमता निगडित शिक्षणासाठी कटीबद्ध असेल. हे प्रशिक्षण पुढीलप्रमाणे विविध स्वरूपात असेल:

iGOT अभ्यासक्रम: iGOT मंचावर शिफारस केलेले अभ्यासक्रम पूर्ण करणे

दैनिक वेबिनार: अंतर्दृष्टीपूर्ण व्याख्याने आणि धोरणनिर्मिती अध्यापन

MDO-वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम: iGOT आणि अंतर्गत परिसंवादांद्वारे मंत्रालयनिहाय शिक्षण सत्रांमध्ये सहभागी होणे

शिक्षणाची उद्दिष्टे कर्मयोगी मोहीमेच्या व्यापक उद्दिष्टांशी जुळतानाच कर्मयोगीच्या पुढील चार संकल्पांना बळकटी देतात: विकास, गर्व, कर्तव्य आणि एकता. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला त्यांच्या जबाबदाऱ्यांनिहाय बनविण्यात आलेले अभ्यासक्रम निवडण्यासाठी प्रोत्साहित केले जाते, मग ते अनिवार्य प्रशिक्षण याद्या, भूमिका-विशिष्ट प्रशिक्षण, मंत्रालय-मान्यताप्राप्त पर्याय असोत अथवा त्यांची वैयक्तिक कौशल्ये आणि योगदान वाढविण्यासाठी स्वयं-निवड अभ्यासक्रम असतील.

कर्मयोगी  मोहीम: राष्ट्रीय विकासासाठी सक्षमता निर्माण करणे.

कर्मयोगी मोहीमेचे उद्दिष्ट शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सक्षमता-आधारित क्षमता निर्माण प्रवासात ऑनलाइन, समोरासमोर आणि संमिश्र शिक्षण-सक्षम करून, विशिष्ट विषयांवर चर्चा सुलभ करत, करिअर मार्गांचे योग्य व्यवस्थापन करून मार्गदर्शन करण्यासाठी एक व्यापक सर्वसमावेशक ऑनलाइन मंच विकसित करणे आणि राखणे, तसेच अधिकाऱ्यांची विश्वासार्ह क्षमता दर्शवत मूल्यांकन सक्षम करणे हे आहे.

अधिकाऱ्यांना भविष्याच्या दृष्टीकोनातून सक्षम करण्यासाठी सतत केव्हाही-कोठेही शिकण्याची प्रवृत्ती विकसित करून सशक्त डिजिटल परिसंस्थेची स्थापना करत भारतीय नागरी सेवा क्षमता बांधणी वृद्धिंगत करून परिवर्तन घडवण्याचा या मोहीमेचा प्रयत्न आहे.

सुधारणेची गरज

धोरण निर्मितीत आणि अत्याधुनिक वितरणाची अंमलबजावणी करण्यात शासकीय कर्मचारी महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, सध्याच्या नागरी सेवा क्षमता बांधणी परियोजना खालील आव्हानांमुळे कमकुवत राहिल्या.

विद्यमान प्रशिक्षण धोरणातील हस्तक्षेप तुटक आणि प्रामुख्याने वैयक्तिक आणि अधूनमधून होत असलेल्या नवकल्पनांपर्यंत मर्यादित

स्वतंत्र विभागांमध्ये कार्य करणे, एकत्रित दृष्टिकोन आणि राष्ट्रीय प्राधान्यांबद्दल समजून न घेणे

सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आजीवन आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक वातावरणाचा अभाव

ज्ञान देवाणघेवाणीत असणारे अडथळे सहकार्याला प्रतिबंधित करणारे

या मोहिमेद्वारे नियमांवर आधारित व्यवस्थापन प्रणालीकडून कार्यान्वित व्यवस्थापन प्रणालीकडे जाण्यास प्रोत्साहन दिले जाईल. योग्य व्यक्तीला योग्य वेळी योग्य कार्यासाठी नियुक्त करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

एकात्मिक सरकारी ऑनलाइन प्रशिक्षण म्हणजेच इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाइन ट्रेनिंग (आयजीओटी) व्यासपीठ:

कर्मयोगी मोहिमेची भक्कम अशी डिजिटल बाजू

कर्मयोगी मोहिमेच्या मध्यवर्ती भागात आयजीओटीचे हा मंच आहे. हा मंच विविध विषयांवर 1,400 पेक्षा अधिक अभ्यासक्रमांची ऑनलाइन सूची उपलब्ध करून देतो. यामध्ये आतापर्यंत 45 लाखांपेक्षा जास्त शासकीय कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच 1.6 कोटींपेक्षा जास्त अभ्यासक्रम पूर्ण झाले आहेत. भारतीय शासकीय सेवकांच्या कौशल्ये आणि ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेत परिवर्तन घडवण्यासाठी ‘आयजीओटी’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा मिश्रित शिक्षणाच्या स्वरूपातून, आयजीओटी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या शिकण्याच्या प्रवासाचा मागोवा घेण्यास मदत करते, ज्यामुळे एक संरचित क्षमता असलेली चौकट तयार होते.

आयजीओटी व्यासपीठावरील अभ्यासक्रम, यांची वर्गवारी ही त्यांचे महत्त्व लक्षात घेत सखोल प्रशिक्षण देण्याकरता तयार केली गेली आहे.

सामान्यतः शिफारस केलेले अभ्यासक्रम:

सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी “विकसित भारत” आणि “जन भागीदारी” सारखे सामान्य अभ्यासक्रम.

भूमिकेनुसार प्रशिक्षण: कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (डीओपीटी) विशिष्ट भूमिकांसाठी आवश्यक असलेल्या प्रमुख क्षमतांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून अभ्यासक्रम तयार करतो.

मंत्रालयाने शिफारस केलेले अभ्यासक्रम: प्रत्येक मंत्रालय त्यांच्या वार्षिक क्षमता विकास योजनेनुसार (एसीबीपी) आवश्यक अभ्यासक्रम निश्चित करते.

स्वतः निवडलेले अभ्यासक्रम: अधिकारी त्यांच्या वैयक्तिक आवडी आणि उद्दिष्टांनुसार त्यांच्या पुढील योगदानासाठी विषय निवडू शकतात.

भविष्यासाठी एक दृष्टिकोन

कर्मयोगी मोहीम आणि कर्मयोगी सप्ताह भारताच्या परिवर्तनशील राष्ट्रीय प्रगतीस चालना देणाऱ्या शासकीय कर्मचार्‍यांच्या विकासासाठी भारताच्या बांधिलकीचे प्रतिनिधित्व करतात. शासकीय कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय विकास प्राधान्यांशी संरेखन, आजीवन शिकण्याचे सशक्त वातावरण तयार करणे, आणि नागरिक-केंद्रित दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे. कर्मयोगी मोहिमेने प्रदान केलेली संरचित आणि शाश्वत शिक्षण प्रणाली भारताच्या शासकीय कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणेल, आणि देशाला 2047 सालापर्यंत “विकसित भारत” बनविण्याकडे वाटचाल करेल.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन एरिगैसीला दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा …