गुरुवार, मई 14 2026 | 07:44:51 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / उद्योगांना दोनवेळा मंजुरी घेण्यापासून सूट : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केली अधिसूचना

उद्योगांना दोनवेळा मंजुरी घेण्यापासून सूट : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केली अधिसूचना

Follow us on:

नवीन उद्योगांच्या स्थापनेसाठी पर्यावरण मंजुरी (EC) आणि उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी (कन्सेंट टू एस्टॅब्लिश,CTE) अशाप्रकारे दोनवेळा  परवानगी घेण्याची पूर्वी जी आवश्यकता असे,ती काढून टाकण्याची  उद्योगांची दीर्घकालीन मागणी भारत सरकारने मान्य केली आहे. आता प्रदूषण न करणाऱ्या श्वेत श्रेणीतील उद्योगांना,अशी परवानगी (CTE किंवा CTO) घेण्याची अजिबात गरज भासणार नाही.ज्या उद्योगांनी उद्योग सुरू करण्यासाठी पर्यावरण समितीची (EC)परवानगी घेतली आहे; त्यांना पुन्हा CTE घेण्याची आवश्यकता रहाणार नाही. यामुळे केवळ संमती घेण्यासाठी लागणारा भार कमी होईल इतकेच नव्हे तर, दोनदोनदा मंजुरी घेण्यालाही आळा बसेल. यासंबंधीच्या अधिसूचना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे हवामान आणि जल कायद्याअंतर्गत  जारी केल्या आहेत.

या अधिसूचनेनुसार या दोन प्रकारच्या मंजुऱ्यांना प्रभावीपणे एकत्र केले गेले आहे आणि सीटीई प्रक्रियेदरम्यान विचारात घेतलेल्या मुद्द्यांनुसार,पर्यावरण मंजुरी (EC) घेण्यासाठी या संदर्भात एक मानक प्रक्रिया देखील जारी करण्यात आली आहे.या प्रक्रियेदरम्यान राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांशी विचार विनिमय केला जाईल.परंतु उद्योगांना राज्य सरकारला सीटीई फी भरणे आवश्यक असेल,जेणेकरून राज्यांच्या महसुलाचे कोणतेही नुकसान होणार नाही.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

सरगुजा में नशे के बड़े नेटवर्क का भंडाफोड़: 1800 नशीली दवाओं के साथ हत्या का फरार आरोपी गिरफ्तार

रायपुर | सोमवार, 19 अप्रैल 2026 छत्तीसगढ़ के सरगुजा संभाग में नशे के काले कारोबार …