गुरुवार, दिसंबर 12 2024 | 11:02:26 PM
Breaking News
Home / अन्य समाचार / आधार आधारित ओटीपीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे यूएएन ऍक्टिवेशन सुनिश्चित करण्याचे मंत्रालयाचे निर्देश

आधार आधारित ओटीपीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे यूएएन ऍक्टिवेशन सुनिश्चित करण्याचे मंत्रालयाचे निर्देश

Follow us on:

कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान/प्रोत्साहनभत्ता यांची देय रक्कम आधार पेमेंट ब्रिजच्या माध्यमातून मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच मंत्रालये/ विभाग यांना निर्देश दिले आहेत आणि 100 टक्के बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण सुनिश्चित केले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये जाहीर केलेली एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह(ईएलआय) या योजनेचे लाभ जास्तीत जास्त नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांना मिळत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ईपीएफओला नियोक्त्यांसोबत एका मोहिमेच्या स्वरुपात काम करण्याचे आणि कर्मचाऱ्यांचा यूनिवर्सल अकाऊंट नंबर(यूएएन) अर्थात सार्वत्रिक खाते क्रमांकांचे ऍक्टिवेशन करून देण्याची काळजी  घेण्याचे निर्देश ईपीएफओला दिले आहेत.

ईपीएफओ त्यांच्या विभागीय आणि प्रादेशिक कार्यालयांना प्रभावी संपर्कासाठी सहभागी करेल.

आधारचा ओळख पटवण्याचा एक दस्तावेज म्हणून वापर केल्यामुळे सरकारी वितरण प्रक्रिया सुलभ होतात, पारदर्शकतेत आणि कार्यक्षमतेत वाढ होते आणि लाभार्थ्यांना देय असलेले लाभ सुविहित पद्धतीने मिळणे सुनिश्चित होते. आधार आधारित पडताळणीमुळे एखाद्याची ओळख पटवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे सादर करण्याची गरज उरत नाही.

पहिल्या टप्प्यात सर्व नियोक्त्यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेत रुजू झालेल्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची, सर्वात शेवटी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यापासून सुरुवात करत यूएएन- ऍक्टिवेशन प्रक्रिया आधार- आधारित ओटीपी च्या माध्यमातून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याची गरज आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण केलीच पाहिजे.

यूएएन ऍक्टिवेशनमुळे कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या सर्वसमावेशक ऑनलाईन सेवा कोणत्याही अडथळ्याविना उपलब्ध होतात, त्यामुळे त्यांना त्यांचे प्रॉव्हिडंट फंड खाते कार्यक्षम पद्धतीने हाताळता येते, पाहता येते आणि पीएफ पासबुक डाऊनलोड करून घेता येतात, पैसे काढण्यासाठी, आगाऊ रकमेसाठी किंवा हस्तांतरणासाठी ऑनलाईन क्लेम सादर करता येतात, वैयक्तिक माहिती अद्ययावत करता येते आणि आपले क्लेम रियल टाईम(तत्क्षणी) तपासता येतात. यामुळे कर्मचाऱ्यांना ईपीएफओ सेवा 24/7 स्वरुपात त्यांच्या घरातूनच उपलब्ध होतात, ज्यामुळे त्यांना ईपीएफओ कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देण्याची गरज राहात नाही.

ऍक्टिवेशन प्रक्रिया आधार-आधारित OTP (वन-टाइम पासवर्ड) वापरून पूर्ण केली जाऊ शकते. नियोक्त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या कर्मचाऱ्यांनी खालील पायऱ्यांनुसार यूएएन ऍक्टिवेट केला आहे:

  1. ईपीएफओ मेंबर पोर्टलवर जा
  2. “Important Links” अंतर्गत “Activate UAN” लिंकवर क्लिक करा.
  3. यूएएन, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि आधार-लिक्ड मोबाईल क्रमांक प्रविष्ट(Enter) करा.
  4. कर्मचाऱ्यांनी ईपीएफओच्या डिजिटल सेवांची संपूर्ण हाताळणी करण्यासाठी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचा मोबाईल क्रमांक आधार सोबत जोडलेला आहे
  5. आधार ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी सहमती द्या.
  6. तुमच्या आधार लिंक्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त करण्यासाठी “Get Authorization PIN” वर क्लिक करा.
  7. ऍक्टिवेशन पूर्ण करण्यासाठी ओटीपी एन्टर करा.
  8. ऍक्टिवेशन यशस्वी झाल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक पासवर्ड पाठवला जाईल.

दुसऱ्या टप्प्यात अधिक पुढे जात यूएएन ऍक्टिवेशनमध्ये फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्याधुनिक बायोमेट्रिक प्रमाणिकरणाची सुविधा समाविष्ट असेल.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …