सोमवार, दिसंबर 23 2024 | 09:14:03 AM
Breaking News
Home / अन्य समाचार / सार्वजनिक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रातील सहकार्यावरील भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाची बैठक संपन्न

सार्वजनिक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रातील सहकार्यावरील भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाची बैठक संपन्न

Follow us on:

‘सार्वजनिक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रातील सहकार्य’ यावर  भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाची बैठक झाली. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे  सचिव  व्ही. श्रीनिवास आणि सार्वजनिक सेवा  (विकास) उपमहासंचालक दातुक डॉ. अनेसी बिन इब्राहिम यांनी संयुक्तपणे संयुक्त कार्यगटाचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला राष्ट्रीय सुशासन विभागाचे महासंचालक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे; प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे अतिरिक्त सचिव पुनीत यादव आणि दोन्ही देशांचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मलेशियातील भारताचे उच्चायुक्त बी.एन. रेड्डी यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.

  

उभय देशांनी प्रशासकीय सुधारणा आणि सुशासनातील घडामोडी सामायिक केल्या.

संयुक्त कार्यगटाच्या बैठकीचे फलित म्हणून, दोन्ही देशांनी पुढील बाबींवर सहमती दर्शवली:

  1. एनसीजीजी च्या माध्यमातून  मलेशियाच्या नागरी सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यासाठी एक संयुक्त कार्य गट स्थापन करणे.  संयुक्त कार्यकारी गटात डीएपीआरजी, पीएसडी, मलेशिया, एनसीजीजी  मधील सदस्य आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यांचा समावेश असेल.
  2. दोन्ही सरकारांद्वारे सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान  करण्यासाठी एक संयुक्त वेबिनार आयोजित करणे  ज्यामध्ये सरकारचे  योग्य प्रतिनिधित्व, सार्वजनिक सेवा कायदा; दोन्ही सरकारांद्वारे सर्वोत्तम पद्धतींच्या वाटणीसाठी कामगिरीवर आधारित पुरस्कार इ. समावेश असेल.
मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ)ની 63મી વાર્ષિક પરિષદનું આયોજન કરશે

ઇન્ડિયન સોસાયટી ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએસએએમ) 05થી 07 ડિસેમ્બર 2024 દરમિયાન ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ એરોસ્પેસ મેડિસિન (આઇએએમ), …