मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3,350 ग्रॅम सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत तब्बल 2.67 कोटी रुपये आहे. या तस्करी प्रकरणात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक कनिष्ठ कर्मचारी आणि ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा यात समावेश आहे. विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वारावर ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेला थांबवले असता त्यावेळी तिच्याकडे द्रव्य स्वरूपात लपवून ठेवलेले सोने आढळले. तपासात समोर आले की, विमानतळावरील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने ‘इवाय 200’ या विमानाच्या वेस्ट कार्टमधून सोने बाहेर काढून ते एका महिला कर्मचाऱ्याकडे दिले. जेणेकरून ती महिला तिचा विमानतळ प्रवेश परवाना (एइपी) वापरून ते सोने बाहेर नेऊ शकेल. या दोन्ही व्यक्तींना सीमाशुल्क कायदा , 1962 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
Home / अन्य समाचार / महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने 2.67 कोटी रुपयांचे सोने केले जप्त, मुंबई विमानतळावर तस्करी प्रकरणात दोघांना अटक
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने 2.67 कोटी रुपयांचे सोने केले जप्त, मुंबई विमानतळावर तस्करी प्रकरणात दोघांना अटक
Follow us on:
Tags arrested Directorate of Revenue Intelligence gold Mumbai airport Mumbai Division seizes smuggling case
मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here

Check Also
मोदी के बाद की बीजेपी!
– डॉ. अतुल मलिकराम भारतीय राजनीति के वर्तमान दौर को यदि मोदी युग कहा जाए, …