मंगलवार, दिसंबर 03 2024 | 02:58:27 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / नियम 267 चा उपयोग कामकाजात व्यत्यय निर्माण करणारे अस्त्र म्हणून केला जात आहे – राज्यसभा सभापती

नियम 267 चा उपयोग कामकाजात व्यत्यय निर्माण करणारे अस्त्र म्हणून केला जात आहे – राज्यसभा सभापती

Follow us on:

राज्यसभेत आज गदारोळातच सभापती जगदीप धनखड यांनी सदस्यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आठवड्याभरात तेच  तेच मुद्दे वारंवार उपस्थित केले गेले असून आपण कामकाजाचे 3 दिवस वाया घालवले आहेत. सार्वजनिक कारणासाठी वचनबद्धता असलेले हे ते दिवस आहेत. अपेक्षेप्रमाणे आपण आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे.

वेळेचे नुकसान, संधी गमावणे, प्रश्नोत्तराचा तास होत नसल्यामुळे संधी गमावणे, यामुळे जनतेच्या हिताचे मोठे नुकसान होत आहे.

माननीय सदस्यांनी सखोल चिंतन करावे. नियम 267 चा उपयोग व्यत्यय निर्माण करणारे अस्त्र म्हणून केला जात आहे, आपल्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण करण्यासाठी होत आहे. सदनात अत्यंत वरिष्ठ सदस्य आहेत. सदनातला गदारोळ ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

या प्रकारावर मी तीव्र खेद व्यक्त करत आहे. अत्यंत दुःखाची ही बाब आहे. आपण अशोभनीय उदाहरण समोर ठेवत आहोत. या देशातील लोकांचा आपण अपमान करत आहोत. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता  आपण करत नाही.

आपली कृती लोककेंद्रित नाही. लोकांमध्ये याबाबत नापसंती आहे. आपण असंबद्धतेच्या दिशेने जात आहोत.

कृपया मी तुम्हाला आवाहन करतो.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

कोन्याक : स्क्रिनरायटर्स लॅब पारितोषिक विजेता चित्रपट ‘फिल्म बाजार 2024’ मध्ये चमकला

गोवा इथे भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) चा एका भव्य सोहळ्यात नुकताच समारोप झाला. राष्ट्रीय …