(माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 19 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला.)
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
(संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षातील, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला; लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी; राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार आणि इतर मान्यवर)
यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी; राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे; संसदेच्या आजी आणि माजी खासदारांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. मोदी यांनीही इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
इंदिरा गांधी यांच्या छायाचित्राचे अनावरण 19 नोव्हेंबर 1987 रोजी तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षात करण्यात आले होते.