दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईत नौदल गोदीत एलएसएएम 12 (यार्ड 80) या सहाव्या क्षेपणास्त्र आणि दारुगोळा वाहक (एमसीए) बार्जचा समावेश समारंभ पार पडला. पश्चिमी नौदल कमांड मुख्यालयातील कमांड रेफिट अधिकारी सीएमडीई अभिरूप मजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला.
दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी विशाखापट्टणम् येथील सिकॉन इंजिनियरिंग प्रोजेक्ट्स या जहाजबांधणी एमएसएमई कंपनीशी आठ एमसीए बार्जच्या बांधणीचा करार करण्यात आला. या कंपनीने भारतीय जहाज संरचना कंपनीच्या सहकार्याने स्वदेशी तंत्रज्ञानाने या जहाजांची रचना करुन सागरी परिचालनासाठी विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत यशस्वी नमुना चाचणी घेतली. भारतीय नौवहन रजिस्टर (आयआरएस) मधील संबंधित नौदल नियम आणि नियमाने यांच्या नुसार या बार्जेसची उभारणी करण्यात आली आहे. ही जहाजे म्हणजे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया तसेच आत्मनिर्भर भारत उपक्रमांचे अभिमानी ध्वजवाहक ठरले आहेत.
या जहाजांच्या समावेशामुळे जेटीवर तसेच बाह्य बंदरांवर भारतीय नौदलाच्या प्लॅटफॉर्म वरुन वाहतूक, वस्तू आणि दारुगोळा जहाजावर चढवणे तसेच इच्छित स्थळी उतरवणे सुलभ होणार असल्याने भारतीय नौदलाच्या परिचालनात्मक कटिबद्धतेला चालना मिळणार आहे.